घरमनोरंजनविकीच्या 'उधम सिंह'च्या स्क्रिनिंगला कतरिनाची हजेरी, अफेअरच्या चर्चांना उधाण

विकीच्या ‘उधम सिंह’च्या स्क्रिनिंगला कतरिनाची हजेरी, अफेअरच्या चर्चांना उधाण

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कॅफ या दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याचा चर्चा रंगत आहेत. मात्र या चर्चांना कतरिना किंवा विकी कौशलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. अशातच विकी कौशलचा बहुप्रतिक्षित ‘सरदार उधम सिंह’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शुक्रवारी रात्री चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.

तिथे अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते. या स्क्रिनिंगवेळी बॉलिवूड सेलेब्समध्ये कतरिना कॅफने देखील एन्ट्री घेताना दिसली. कतरिना येताच सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. मात्र कतरिनाच्या हजेरीमुळे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

- Advertisement -


यावेळी कतरिना अगदी कॅज्युअल लुकमध्ये दिसली. कतरिना स्वेटशर्ट, स्कर्ट आणि हायहिल्स परिधान केली होती. यावेळचा कतरिनाचा आनंद पाहण्यासारखा होता. तिने फोटोग्राफर्ससाठी पोजही दिल्या.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ​​देखील विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचले होते. यावेळी सिद्धार्थ अगदी कॅज्युअल लुकमध्ये तर कियारा पारंपरिक अवतारात दिसली. ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. याशिवाय राजकुमार हिरानी, अंगीरा धर, आनंद तिवारी, तिग्मांशु धुलिया, शूजित सिरकार सारख्या सेलेब्सने देखील स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली. “उधम सिंह’ हा सिनेमा स्वातंत्र्यसेनानी सरदार उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -