Taliban Afghanistan: अफगाणिस्तानातील ‘तालिबान राज’मुळे पाकला आनंदाच्या उकळ्या

They have broken chains of mental slavery said pm imran khan about afghanistan and taliban fight
Taliban Afghanistan: अफगाणिस्तानातील 'तालिबान राज'मुळे पाकला आनंदाच्या उकळ्या

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर (afghanistan and taliban fight) याबाबत पाकिस्तानची भूमिका काय असेल? असे प्रश्न निर्माण होत होते. पण पाकिस्तान नेत्यांचे यासंदर्भातील विधान पाहिले तर ते अफगाणिस्तानमध्ये ‘तालिबान राज’ आल्यामुळे खूप खुश असल्याचे दिसत आहे. यादरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (pm imran khan) यांचे विधान समोर आले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात इमरान खान तालिबानचे समर्थन करताना दिसत आहेत.

सध्या तालिबानने अफगाणिस्तानमध्ये वर्चस्व मिळवल्यामुळे अफगाणी लोकं देशाबाहेर जाण्यास धडपड करत आहेत. या धडपडीदरम्यान काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. अशा परिस्थितीत तालिबान जिंकल्यामुळे जल्लोष करताना दिसत आहे. यामुळे पाकिस्तानला देखील आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. पाकिस्तानी टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान इमरान खान तालिबानचे स्वागत करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये इमरान खान म्हणतात की, ‘त्यांनी (तालिबान) अफगाणिस्तानातील मानसिक गुलामीची बंधन तोडली आहेत. मानसिक गुलामीची बंधन तोडणे खूप कठीण असते. परंतु आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानने केले आहे.’

यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) म्हणाले होत की, ‘पाकिस्तान तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय सहमती, जमीन, पाकिस्तानच्या राष्ट्रीय हितांनुसार मान्यता देईल. तसेच लवकरच ते चीन, इराण, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसह शेजारील देशांच्या नेतृत्वाशी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करतील.’

अफगाणिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर अनेक देशांनी पाकिस्तानला फटकारले आहे आणि यादरम्यानच पंतप्रधान इमरान खान आणि परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी तालिबानला समर्थन दर्शवणारे वक्तव्य केले आहे. काही देशांनी तालिबानला पाकिस्तानने मदत केल्याचा आरोप केला आहे.


हेही वाचा – Taliban: तालिबानचा भारतासाठी मैत्रीचा पैगाम, पण भारत-पाक वादात पडणार नाही