घरमनोरंजनसुशांतच्या वडिलांनी चितेला दिला अग्नी; त्यांच्या वेदना असह्य होत्या: विवेक ओबेरॉय

सुशांतच्या वडिलांनी चितेला दिला अग्नी; त्यांच्या वेदना असह्य होत्या: विवेक ओबेरॉय

Subscribe

सध्या हे विवेकचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या अंत्यदर्शनाला हजेरी लावल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी ट्विटरवर एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे विवेकने आपल्या मनातल्या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या त्यांला सुशांतच्या अंत्यविधीदरम्यान जाणवल्यात. सध्या हे विवेकचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

- Advertisement -

त्यांने असे लिहिले, “सुशांतच्या अंत्यसंस्कारात हजर राहणं खूप त्रासदायक होतं. मी खरोखर प्रार्थना करतो की, मी माझा वैयक्तिक अनुभव त्याच्याबरोबर शेअर केला असता आणि त्याला आपलं दुखः कमी करण्यास मदत केली असती… अशाच परिस्थितीतून मी देखील गेलो आहे. माझा प्रवासही असा आहे. तो खूप वेदनादायक आणि एकटेपणाचा असू शकतो. ”

विवेक म्हणाला, “… पण मृत्यू या प्रश्नांची उत्तरे कधीच असू शकत नाही, आत्महत्या हा कधी योग्य मार्ग नसू शकतो. माझी इच्छा आहे की, कदाचित त्याने आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या मित्रांबद्दल आणि त्याच्या चाहत्यांविषयी विचार करणं बंद केलं असतं तर हे जे नुकसान झालं आहे ते झालं नसतं. तसेच लोक त्याच्याबद्दल किती काळजी करतात हे त्याला कळले असते. ”

- Advertisement -

“आज जेव्हा सुशांतचे वडील त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याच्या चितेला अग्नी देत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील वेदना असह्य होत्या. जेव्हा मी त्याच्या बहिणीला रडताना पाहिले आणि त्याला परत येण्यास सांगत होती, त्यावेळी माझे मन हदरले होते.”

त्यांनी लिहिले, “मला आशा आहे की, आमची इंडस्ट्री स्वतःला एक कुटुंब म्हणवून घेईल, स्वत: ला चांगले बनण्यासाठी बदलण्याची गरज आहे, आपण एकमेकांच्या वाईट गोष्टी करण्यापेक्षा एकमेकांना मदत करण्याची गरज आहे.” अहंकाराबद्दल कमी विचार करून टॅलेंटेड आणि डिसर्विंग लोकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. ”


सुशांतची आत्महत्या वहिनीला सहन झाली नाही, डिप्रेशनमध्ये झाला मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -