घरमनोरंजनमानुषी - रणवीर बॉलीवूडची नवी जोडी?

मानुषी – रणवीर बॉलीवूडची नवी जोडी?

Subscribe

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर आणि अभिनेता रणवीर सिंहने नुकतीच एक अॅड फिल्म शूट केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडीओला भरपूर पसंती मिळते आहे.

अभिनेता रणवीर सिंह त्याच्या आगामी सिम्बा या सिनेमामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. निर्माता- दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या सिम्बा या अॅक्शन फिल्ममध्ये रणवीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाची काही पोस्टर्स रिलीज झाली असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. तर दुसरीकडे तमाम लोकांचं लक्ष लागून राहिलंय ते विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिच्या बॉलीवूड आगमनाकडे. ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे मानुषीचा पहिला सिनेमा हा रणवीर सिंहसोबतच असल्याचंही केल्या अनेक दिवसांपासून बोललं जात आहे. सिनेमाबाबत अद्याप कोणती ठोस बातमी समोर आली नसली, तरी मानुषी-रणवीरची जोडी सध्या हिट ठरते आहे. याचं कारण म्हणजे नुकतंच या दोघांनी एका अॅड फिल्मचं शूट केलं आहे. मानुषी आणि रणवीरने एकत्र काम केलेल्या या जाहिरातीचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या जाहिरातीमध्ये मानुषी रणवीर सिंहवर भारी पडताना दिसत आहे.

 पाहा, ‘ती’ खास जाहिरात:

सौजन्य- pageantmirro, इन्स्टाग्राम

- Advertisement -

केमिस्ट्री जमली !

रणवीर आणि मानुषीने ही जाहिरात एका कपड्याच्या ब्रँडसाठी केली असून, यामध्ये दोघांची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. रणवीर आणि मानुषी या जाहिरातीत एकच धमाल करताना दिसत आहे. या जाहिरातीच्या व्हिडीओला आणि फोटोंना सध्या सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळते आहे. मानुषी आणि रणवीरचे चाहते या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊन पाडत आहेत. याआधी मानुषी आणि करिना कपूर यांनी एका जाहिरातीमध्ये एकत्र काम केलं होतं. त्या जाहिरातीतही मानुषी आणि करिना यांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दरम्यान रणवीर-मानुषीच्या या जाहिरातीनंतर त्यांचे चाहते आता त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक झाले असणार. मध्यंतरी मानुषीने करण जोहरचा सिनेमा साईन केला असल्याचीही चर्चा होती. मात्र, या अफवा असल्याचा खुलासा मानुषीने स्वत: एका मुलाखती दरम्यान केला होता. मानुषी आणि रणवीर गेल्यावर्षी फिल्म फेअर अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर एकत्र दिसले होते. ती भेट या दोघांची पहिलीच भेट होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -