घरमनोरंजनसुशांत सिंगचा 'सोन चिडिया', पाहा Trailer

सुशांत सिंगचा ‘सोन चिडिया’, पाहा Trailer

Subscribe

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने अगदी कमी कालावधीत बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडली. काही मोजक्याच चित्रपटांमधून सुशांतने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली. अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा हँडसम हंक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाछी तयार आहे. सुशांतचा ‘सोन चिडिया’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘सोन चिडिया’चा जबरदस्त ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यातील कलाकारांचा अभिनय आणि संवाद सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. ट्रेलरमध्ये करण्यात आलेली विषयाची थराररक मांडणी पाहून अंगावर काटा उभा राहतो. ‘सोन चिडिया’ चित्रपटात सुशांत सिंगने एका दरोडेखोराची भूमिका साकारली असून, त्याने साकारलेलं पात्र ट्रेलर पाहताना अंगावर येतं. युट्यूबवर ‘सोन चिडिया’च्या ट्रेलरला लोकांकडून भरभरुन पसंती मिळते आहे. सुशांत सिंग राजपूतचे चाहते तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर आणि  ‘सोन चिडिया’च्या ट्रेलवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. येत्या ८ फेब्रुवारीला ‘सोन चिडीया’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘सोन चिडिया’ चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक चौबे केलं आहे. याआधी त्यांनी इश्किया, डेड इश्किया आणि उडता पंजाबसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान, ‘सोन चिडिया’च्या निमित्ताने अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि सुशांत सिंग राजपूत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सुशांत आणि भूमी दोघांच्याही या चित्रपटातील भूमिका जबरदस्त वेगळ्या ‘नेव्हर सीम बिफोर’ अर्थात आधी कधीही न पाहिलेल्या अशा आहेत. ‘सोन चिडीया’मध्ये रणवीर शौैर्य आणि आशुतोष राणा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. याशिवाय ‘सॅक्रेड गेम्स’ या तूफान लोकप्रिय ठरलेल्या वेब सिरीजमधील ‘बंटी’ म्हणजेच अभिनेता जनित सरना याचीही चित्रपटात छोटेखानी भूमिका असल्याचं ट्रेलर पाहताना लक्षात येतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -