घरमनोरंजनवडिलांची हस्तलिखिते गहाळ झाल्याने बिग बींना राग अनावर

वडिलांची हस्तलिखिते गहाळ झाल्याने बिग बींना राग अनावर

Subscribe

अमिताभ बच्चन  त्यांच्या वडिलांच्या कविता अनेक आठवणी सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करतात.

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bacchan) सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.फेसबुक,इंस्टाग्राम,ट्विटर सोबतच अमिताभ बच्चन हे ब्लॉग सुद्धा लिहितात. ब्लॉगमध्ये ते नेहमीच आपल्या आयुष्यातील घडामोडींचा आढावा चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण नुकतच बिग बी यांनी ब्लॉगमध्ये  तीव्र नाराजी आणि राग व्यक्त  करत ब्लॉग पोस्ट केला आहे. अमिताभ बच्चन यांना राग येण्याचे नेमकं कारण काय आहे हे त्यांनी ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे.

काय लिहलं आहे ब्लॉग मध्ये ?
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग मध्ये लिहलं आहे की त्यांचे वडील म्हणजेच हरिवंश राय बच्चन यांच्या हस्तलिखिते(manuscripts) हरवल्या आहेत. त्यांना ते सापडत नाहीये. “खूप राग येत आहे कारण… त्यांची हस्तलिखिते अजूनही सापडत नाहीये. कारण घरी काही बदलाव झाले आहेत. वडिलांच्या आत्मचरित्रात अनेक कवितांचे संदर्भ होते.मी जेव्हा त्यांचे आत्मचरित्र वाचले होते तेव्हा तिथे संदर्भ होते, पण आता त्या हस्तलिखिता कुठे आहेत ..माहित नाही. आत्तासाठी, घटना मला वारंवार आठवण करून देतात, माला याची काहीही कल्पना नाही आणि हे तितकेच त्रासदायक आहे.हस्तलिखिता कोठेतरी ठेवणे हा एक निष्काळजीपणाचा गुणधर्म आहे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कधीही मिळणार किंवा मिळणार नाही.कारण तुम्ही विसरला आहात .कधी-कधी मला आश्चर्य वाटते की   खरोखरच हा लेखा -जोखा ठेवणे आवश्यक आहे काय? तरीही मला बाबूजी आठवतात .. जर त्यांनी तसे केले नसते तर मी कुठे असतो….

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

अमिताभ बच्चन  त्यांच्या वडिलांच्या कविता अनेक आठवणी सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करतात. वर्क फ्रंट बाबतीत सांगयाचे झाल्यास सध्या बिग बी कोन बनेगा करोडपती सीझन 13 होस्ट करताना दिसणार आहे. तसेच गुडबाय, ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, मेडे मध्ये अमिताभ बच्चन यांची वर्णी लागली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – कियाराने शेअर केला बिकनी मधील हॉट फोटो,म्हणाली लाटांना कोणीच थांबवू शकत नाही..

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -