घरताज्या घडामोडीवडील – मुलीचा तो सायकल प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर!

वडील – मुलीचा तो सायकल प्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर!

Subscribe

चित्रपटात दिल्ली ते दरगंभा पर्यंतचा प्रवास दाखण्यात येणार असून शूटिंग सेटवर न करता रिअल लोकेशन्सवर करण्यात येणार असल्याचंही निर्मात्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनच्या काळात आपल्या आजारी वडिलांना सायकलवरून गुरुग्राम ते दरगंभा असा १२०० किमीचा प्रवास  ज्योती कुमारीने केला. या ज्योती कुमारच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे.  ‘वी मेक्स फिल्म्स’ या बॅनरनं ज्योती कुमारीचा प्रवास पडद्यावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्योती स्वत: या चित्रपटात काम करणार आहे. ज्योती कुमारीच्या या चित्रपटाचं नाव ‘आत्मनिर्भर’ आहे. शाइन शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि मैथिली अशा तीन भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे.

- Advertisement -

चित्रपटात दिल्ली ते दरगंभा पर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार असून शूटिंग सेटवर न करता रिअल लोकेशन्सवर करण्यात येणार असल्याचंही निर्मात्यांनी सांगितलं. ज्योतीचे वडील मोहन पासवान हे गुरुग्राम येथे ऑटोरिक्षा चालवतात. पण त्यांना दुखापत झाली आणि त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. त्यांना आपली ऑटोरिक्षा मालकाला परत करावी लागली. त्यामुळं त्यांनी आपल्या मूळ गावी दरभंगा इथं जाण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाउनमध्ये गाडी किंवा ट्रेननं बिहारला जाणं शक्य होत नव्हतं. म्हणून शेवटी तिनं आपल्या वडिलांना सायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांना सायकलच्या मागे असलेल्या ‘कॅरिअर’वर बसवून गुरुग्राम ते दरभंगा हे १२०० किमीचे अंतर तिनं अंतर ७ दिवसांत कापलं.

बिहारमधील एका गावातील १५ वर्षीय ज्योती कुमारने आपल्या आजारी वडिलांना घेऊन तब्बल १२०० किमीचा सायकल प्रवास लॉकडाऊनमध्ये केला आहे. तिच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलगी इवांका हिनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून या मुलीच्या धाडसाने कौतुक केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – LockDown: वडील – मुलीचा तो सायकल प्रवास; ट्रम्पच्या लेकीनेही केले कौतुक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -