WPL 2023 : कियारा आणि कृतीच्या जबरदस्त परफॉर्मन्सने होणार सोहळ्याची सुरुवात

महिला प्रीमियर लीगची (WPL) आजपासून सुरुवात होणार असून नवी मुंबईतील डी.वाय.पाटील या स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून पहिल्या सामन्याची सुरुवात होणार आहे. हा सामना सुरु व्हायच्या दोन तासांपूर्वी 5:30 वाजता या सोहळ्याचे उद्धाटन होणार आहे. या उद्धाटनात अभिनेत्री क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी जबरदस्त नृत्य सादर करणार आहेत. तसेच प्रसिद्ध गायक एपी ढिल्लो आपल्या गाण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मागील 4 दिवसांपासून कलाकारांची स्टेडियमवर रंगीत तालीम सुरु आहे. शुक्रवारी कियारा आणि कृतीने स्टेडियममध्ये इतर कलाकारांसोबत रिहर्सल केली.

महिला प्रीमियर लीगचा हा पहिला सामना आहे. या स्पर्धेत 5 संघ आमनेसामने असतील. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायन्ट्स यांच्यात होणार आहे. कर्णधार म्हणून हरमनप्रीत (मुंबई) आणि बेथ मुनी (गुजरात) या वेळी आमनेसामने असतील. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरु होईल. याच्या दोन तास आधी उद्घाटन सोहळा सुरू होईल. तसेच 4 वाजता या सोहळ्यासाठी डी.वाय.पाटील यांच्याहस्ते प्रवेशद्वार उघडण्यात येईल.

WPL मध्ये या संघांचा असणार सहभाग

WPL मध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स अशा 5 संघांचा समावेश असणार आहे.

या ठिकाणी पाहता येणार लाईव्ह टेलिकास्ट

महिला प्रीमियर लीगची ओपनिंग सेरेमनीचे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही स्पोर्ट्स-18 1 आणि स्पोर्ट्स-18 1HD चॅनल्सवर पाहू शकता. या सेरेमनीची लाईव्ह स्ट्रीमिंग जियो सिनेमावरही उपलब्ध असेल.

 


हेही वाचा :

मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’