घरफिचर्सरक्षाबंधनाला काय बरं देणार गिफ्ट?

रक्षाबंधनाला काय बरं देणार गिफ्ट?

Subscribe

रक्षाबंधन हा भावाबहिणीच्या नात्याचा तसाच लहानपणापासूनच्या आठवणींचाही सण. बहीण आणि भाऊ कितीही मोठे झाले तरी दोघांच्याही मनात असतं ते गिफ्ट नक्की द्यायचं? अर्थात दरवर्षी प्रत्येक भावाबहिणीला हमखास सतावणारा हा प्रश्न असतो. सण जवळ आला की, राखी घ्यायला गेल्यानंतर सर्वात मोठा पहिला प्रश्न उभा राहतो बहिणीसाठी तो म्हणजे भावाला नक्की काय गिफ्ट घ्यायचं? आणि भावासाठीही हाच प्रश्न बर्‍याचदा अडचणीचा ठरतो. कारण बहिणीकडे तर सगळंच असतं. आज बाजारात इतक्या वस्तू उपलब्ध आहेत की, त्यातून नेमकं काय घ्यायचं हाच मोठा प्रश्न प्रत्येकाला सतावतो. त्यातल्या त्यात बहिणीसाठी जे घेतलं ते तिला आवडलंही पाहिजे याचीही काळजी लागलेली असते. काही वर्षांपूर्वी भाऊ बहिणीसाठी कानातले, बांगड्या, हेअरबँड अशाही वस्तू लहान असताना घ्यायचे. पण आता लहान मुलेही मोठ्या महागड्या वस्तू द्यायला लागले आहेत. त्यामुळं यावेळी रक्षाबंधनाच्या गिफ्टसाठी काय पर्याय आहेत याची एक छोटीशी यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 पत्र लिहा

तुम्हाला हे वाचून थोडंसं पहिले विचित्र वाटेल. पण खरं आहे. आपण रोजच्या आयुष्यात आपल्या भावाबहिणीला त्यांच्याबद्दलचं असणारं प्रेम व्यक्त करणं विसरूनच जातो. अशावेळी या खास दिवशी तिच्या/त्याच्यासाठी खास तुमच्या अक्षरातलं आणि तुमच्या भावना असणारं पत्र लिहा. त्यासाठी अगदी कवी असण्याची गरज नाही. आपल्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्यास, आपल्या भावा – बहिणीपर्यंत योग्य तर्‍हेनं नक्कीच पोहचू शकतात आणि हे गिफ्ट कायमस्वरुपी त्यांच्या लक्षातही राहू शकतं आणि वॉर्डरोबमध्ये जपून ठेवताही येऊ शकतं.

 जुन्या आठवणींची फ्रेम

लहानपणापासूनचे फोटो तर प्रत्येकाकडे असतात. पण रोजच्या घाईगडबडीच्या धावपळीत लहानपणीचे क्षण कुठेतरी हरवून जातात. याच क्षणांची आठवण करून देणार्‍या जुन्या आठवणींच्या फोटोंची एक फ्रेम बनवून आपल्या भाऊ अथवा बहिणीला द्या. या आठवणींना उजाळा देत रक्षाबंधन साजरं करण्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि मजा असेल.

- Advertisement -

 पॉलिसी

आपल्या बहीण अथवा भावासाठी एखादी पॉलिसी काढून द्यावी. ही त्यांच्यासाठी वेगळं गिफ्ट ठरू शकतं. आजकाल बर्‍याच पॉलिसींची माहिती मिळते. त्यामुळं आपल्या भावा-बहिणीसाठी योग्य असणारी एखादी पॉलिसी काढून त्याचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं आणि त्यांचं पुढील आयुष्य आपल्याकडून सुरक्षित करता येतं का ते पाहावं.

पुस्तकं

पुस्तक हा आपला मित्र असतो असं म्हटलं जातं. जर तुमच्या भावा-बहिणीला पुस्तकांची आवड असेल तर गिफ्ट म्हणून हा उत्तम पर्याय आहे. पुस्तकातून मिळणारी माहिती हे आयुष्यातील कायमचा खजाना आहे. त्यामुळं आपल्या भावाबहिणीला आवडणार्‍या विषयांवरील पुस्तकं देणं हे उत्तम गिफ्ट ठरू शकतं.

- Advertisement -

 परफ्युम्स

प्रत्येकाला परफ्युम्सची आवड असतेच. त्यामुळं हादेखील चांगला पर्याय आहे. स्पायकर, गुची, निव्हिया असे अनेक पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी आपल्या भावाबहिणीच्या आवडीप्रमाणे एखादा सेट गिफ्ट करावा. मात्र त्यांना कोणत्या सुवासाची आवड आहे, हेदेखील गिफ्ट खरेदी करताना लक्षात घेणं आवश्यक आहे.

सोशल टूरिझम

बरेच भाऊ-बहीण हे एकमेकांपासून खूप दूर राहतात. त्यांना एकमेकांना भेटणंही शक्य नसतं. त्यामुळं अशावेळी सोशल टूरिझमचं बुकिंग करून ऑनलाईन तुमच्या भाऊ अथवा बहिणीला पाठवून देऊ शकता. त्यामुळं त्यांनाही रोजच्या जगण्यातून वेगळा वेळ काढून थोडी विश्रांती मिळू शकते.

 गिफ्ट व्हाऊचर

बर्‍याचदा एखाद्याला आपण घेतलेलं गिफ्ट आवडत नाही. त्यामुळं आता गिफ्ट व्हाऊचर हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. पैसे देणं पण काही लोकांना योग्य वाटत नाही. त्यांच्यासाठी एखाद्या ठिकाणचं गिफ्ट व्हाऊचर देणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळं कोणत्याही भावाबहिणीला आपल्याला हवं ते गिफ्ट त्या व्हाऊचरच्या सहाय्यानं घेता येऊ शकतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -