घरदेश-विदेशBudget 2019 : सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचा उदो उदो!

Budget 2019 : सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचा उदो उदो!

Subscribe

आज सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्र्यांसह अनेक सत्ताधाऱ्यांनी कौतुक केलं आहे.

देशातील जनतेला मोठा दिलासा – देवेंद्र फडणवीस

देशातील सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू ठेवून केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा अशा घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तीन हजार रुपये पेन्शन असो किंवा शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य, अशा निर्णयातून देशातील सरकारने सर्वसामान्य घटकांच्या उत्थानातून आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.

नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजाची सवलत तर वेळत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त तीन टक्क्यांचा लाभ देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. मनरेगासाठी अधिकची तरतूद केल्याने ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गोमातेचा सन्मान करणाऱ्या राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या स्थापनेमुळे दुधाचे उत्पादन वाढण्यासोबतच शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

सर्वांसाठी समाधानकारक अर्थसंकल्प – रावसाहेब दानवे

‘मोदी सरकारने मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, मध्यवर्गीय अशा सर्व समाज घटकांना समाधान देणारा असून आम्ही त्याचे स्वागत करतो’, अशी प्रतिक्रीया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ‘हा अर्थसंकल्प ‘नवा भारत’ निर्माण करण्यासाठी सर्व समाजाला शक्ती देणारा आहे’, असंही दानवे यांनी म्हटले आहे. दानवे म्हणाले, ‘या अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल आपण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन करतो. पाच एकरापर्यंत शेती असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट देण्याची योजना ऐतिहासिक आहे. ‘

‘शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार दीडपट भावासह अनेक महत्त्वाचे निर्णय यापूर्वी घेतले आहेत. गेल्या पाच वर्षांत देशाला संकटातून बाहेर काढण्यात मोदी सरकार यशस्वी झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात विकासाची मोठी झेप घेण्यास भारत सज्ज झाला आहे’, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

‘जय जवान, जय किसान’ नारा दृढ होणार – बबनराव लोणीकर

देशाच्या संरक्षणासाठी ३ हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केल्यामुळेस हा अर्थसंकल्प ‘जय जवान, जय किसान’चा नारा दृढ करणारा आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. ग्रामीण भारतातील शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिक, सामान्य जनता ते देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प मोदी सरकारने मांडला आहे.  ग्रामीण भारतातील एक हजार गावे डिजिटल करण्याचे धोरण सरकारने जाहीर केले असून एससी, एसटीच्या अर्थसंकल्पात देखील २५ ते ३० टक्क्यापेक्षा अधिक वाढ केली आहे.

गरीब जनता व सैनिकांचा सन्मान – सदाभाऊ खोत

‘केंद्र सरकाने मांडलेला अर्थसंकल्प हा देशातील शेतकरी, कामगार, गरीब जनता, आणि सैनिकांचा सन्मान करणारा व आत्मविश्वास वाढविणारा आहे,’ अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये २०२० पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने शासनाने पाऊले उचलली आहेत. तसंच देशातील गरीब जनता आणि सैनिक यांच्या हिताच्या अनेक योजनाही राबवण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्यांना जे हवं ते मिळालं – आशिष शेलार

आशिष शेलार म्हणतात, की ‘या अर्थसंकल्पातून मध्यम वर्गीयांना दिलासा मिळाला आहे. किंबहुना म्हणूनच विरोधकांच्या पोटात दुखत आहेत. या बजेटमधून सर्वसामान्यांना जे हवं होतं ते मोदी सरकारने दिलं आहे.’ ‘जेव्हा जनता खुश असते तेव्हा काँग्रेस नाराज असते हे आम्ही गेली अनेक वर्ष पाहिलं आहेट, अशी खोचक टीकाही शेलार यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -