घरफिचर्ससेकंड होमची क्रेझ वाढतेय ...

सेकंड होमची क्रेझ वाढतेय …

Subscribe

रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून थोडं लांब जाऊन चार घटका निवांत घालवण्यासाठी सेकंड होम असावं हे अनेकांचं स्वप्नं असतं. आणि पून्हा नव्या जोमाने परत रोजच्या कामाला लागावे असा एक विचार असतो. सेकंड होमची संकल्पना थेट मध्यमवर्गापर्यंत येऊन पोहोचली आहे.

 गेल्या 10- 15 वर्षांत या सेकंड होमच्या पसार्‍यात सर्वच स्तरांतील लोकांचा समावेश झाला आहे; सेकंड होम नावाचं एक मार्केट फर्स्ट होमच्या जोडीनेच वाढू लागल्याचे दिसून येतं. गेल्या दहा वर्षांत काही ठिकाणी सेकंड होम अपार्टमेंटचा ट्रेण्ड वाढला आहे. स्वतंत्र बंगला घेणे शक्य नाही मात्र सेकंड होम डेस्टिनेशनवर अपार्टमेंटमध्ये दहा ते पंधरा लाखांची सदनिका घेणे शक्य असणार्‍या अनेकांना या सेकंड होम अपार्टमेंटनी आकर्षित केले आहे.

मुंबई-पुण्याशी असलेली कनेक्टिव्हिटी आणि आल्हाददायक हवा या घटकामुळे लोणावळ्याला सर्वाची पसंती असते. ज्यांना लोणावळा शक्य नव्हतं त्यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी असणार्‍या बदलापूर, नेरळ आणि कर्जतकडे मोर्चा वळविला. तर समुद्राचं आकर्षण असणार्‍यांनी पनवेल, पेण, अलिबागकडे धाव घेतली आहे. वीकेण्ड होम अर्थात सुट्टी घालविण्यासाठीचे दुसरे घर. मुंबईपासून साधारण दोन-तीन तासांच्या अंतरावरील लोणावळा, कर्जत, नेरळ या ठिकाणांना प्राधान्य लाभले आहे. त्यातही लोणावळा हे सर्वात आघाडीवर होते, अनेक सिनेकलाकार, उद्योगपतींच्या सुट्टीतल्या बंगल्यांनी लोणावळ्याला वलय प्राप्त करून दिले. सेकंड होमची संकल्पना बर्‍यापैकी रुजत होती, पण त्याचे स्वरूप हे वैयक्तिक होते. कोणाच्या तरी ओळखीने दोन-चार एकराची जागा घ्यायची आणि त्यावर मनासारखा बंगला बांधून देखभालीसाठी एक जोडपं ठेवायचं. असे अनेक बंगले आजदेखील लोणावळा, नेरळ मुरबाड कर्जत आणि शहापूर परिसरांत दिसतात.

- Advertisement -

म्हणजेच ज्यांच्याकडे पहिल्या घराची प्राथमिक गरज भागली आहे आणि सुट्टीतल्या घरासाठी अतिरिक्त पैसे आहेत त्यांनी सेकंड होमकडे मोर्चा वळविला. यामध्ये मध्यवर्गीयांची संख्या वाढू लागली आहे. परवडणा- या घरांबरोबर हे वन टू बीएचके टूमदार बंगलेही बदलापूर पुढील परिसरात मोठया प्रमाणात वाढू लागले आहेत. पन्नास ते शंभर एक जागा खरेदी करून त्या ठिकाणी प्लॉट स्टिस्टीमद्वो छोटे बंगले बांधले जातात. नेरळसारख्या ठिकाणी बंगल्याऐवजी अपार्टमेंट्सच्याही सुविधा वाढू लागल्या. अनेकांनी सेकंड होमचा वापर रिसॉर्टसारखा केला. सेकंड होम भाडयाने दिली जाऊ लागली. आणि सेकंड होम हे पर्यटन स्थळ परिसरात असेल तर सेकंड होममधील रिसॉर्टला चांगली मागणी असते.

सेकंड होम म्हणजे बंगला अशीच ओळख असताना गेल्या दहा वर्षांत काही ठिकाणी सेकंड होम अपार्टमेंटचा ट्रेण्ड वाढला आहे. स्वतंत्र बंगला घेणे शक्य नाही मात्र सेकंड होम डेस्टिनेशनवर अपार्टमेंटमध्ये दहा ते पंधरा लाखांची सदनिका घेणे शक्य असणार्‍या अनेकांना या सेकंड होम अपार्टमेंटनी आकर्षित केले आहे. गावातच ही ठिकाण असतात. रेल्वेने दोन तासांत पोहोचण्याच्या अंतरावर असल्यामुळे अशा अपार्टमेंटना मध्यमवर्गाची पसंती मिळत आहे. यामध्ये नेरळ, तळेगाव, इगतपुरी, मुरबाडसारख्या ठिकाणांना अधिक पसंती आहे. सेकंड होम डेस्टिनेशनवरील अपार्टमेंटकडे एक गुंतवणूक म्हणून पाहिले जाते.

- Advertisement -

मुंबईकरांसाठी गेल्या काही वर्षांत मुरबाड आणि इगतपुरी ही दोन महत्त्वाची केंद्रे विकसित होत आहेत. सध्या या भागात शंभराहून अधिक प्रकल्प कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत नेरळ, कर्जत, अलिबाग, लोणावळा या पलीकडे सेकंड होमचे मार्केट विस्तारले जाऊ लागले आहे. मुरबाड, शहापूर, इगतपुरी, अशा अनेक ठिकाणी हे वाढू लागले आहे. मुंबई शहरापासून जवळचं असणार्‍या ठिकाणी मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरात घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यात सेकंड होमची भर पडली आहे. मुंबईचा विचार केल्यास मुंबईपासून तीन चार तासांच्या अंतरावरील लोणावळा, कर्जत, नेरळ या ठिकाणांना थंड हवेची आणि शांततेची ठिकाणे म्हणून प्राधान्य मिळू लागले. त्यातही लोणावळ्याला जास्त प्राधान्य दिले गेले. दिवसेंदिवस मुंबईची गर्दी वाढत चालल्यामुळे मनमोकळेपणाने श्वास घेत जगणे आता अधिकाधिक कठीण होऊ लागले आहे.

ताज्या आणि मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून घर घेताना देखील लोक मुंबई सोडून इतरत्र पर्यायांचा विचार करू लागले आहेत. मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील बरीच मंडळी प्रशस्त आणि परवडण्याजोग्या घरासाठी नेरळ -कर्जतच्या पर्यायाचा विचार करू लागले आहेत. नेरळ म्हटले की ,लोकांना माथेरानकडे जाण्यासाठीचे टॉय ट्रेनचे जंक्शन ठिकाण इतकीच माहिती असते. परंतु आज नेरळ-कर्जत पट्याचा निरनिराळ्या मार्गाने विकास होऊ लागला आहे. विकास योजना, सरकारी कार्यालये, दळणवळणाच्या पायाभूत सोयीसुविधा यामुळे रिअल इस्टेट बाजारपेठेतील अनेक नामवंत मंडळी गृहसंकुलांसाठी तसेच व्यावसायिक प्रकल्पांसाठी नेरळ-कर्जत पट्यांची निवड करू लागले आहे. याशिवाय उत्तम पर्याय, प्रशस्त जागा त्याचबरोबर आरामदायी सेवासुविधा आणि ते देखील परवडण्याजोग्या किमतीत या सर्व गोष्टींमुळे इथे घरे घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. त्यामुळे फर्स्ट होमच्या जोडीनेच सेकंड होम वाढू लागलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -