घरफिचर्सहवेशीर घरासाठी कर्जत-नाशिक रोडला पसंती

हवेशीर घरासाठी कर्जत-नाशिक रोडला पसंती

Subscribe

घर घ्यायचे असेल तर सर्वसामान्य आणि विकासक नेहमीच कनेक्टिव्हिटीचा विचार करतो. रोड रेल्वे आणि एअर या कनेक्टिव्हिटीमुळे आता नाशिकला अधिकच महत्व आले आहे, मात्र कनेक्टिव्हिटीबरोबच उत्तम हवामानही मन रमायला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील अनेक बिल्डरांनी त्यांचे प्रोजेक्ट नाशिकमध्ये केले आहेत. कर्जतपासून अवघ्या एक-दीड तासांच्या अंतरावर असलेल्या नाशिकरोडवरच आता टुमदार घरे उभी करण्यात येत आहेत आणि ती घरे सेकंड होम म्हणून ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत.

मुंबई, पुण्याच्या तुलनेत महागड्या बजेट होम्सपासून अफोर्डेबल अपार्टमेंटस आणि उंची घरापर्यंत सर्व प्रकारचे पर्याय कर्जतच्या पुढे नाशिकच्या दिशेने उपलब्ध आहेत. घर घेणार्‍यांसाठी या ठिकाणी मुबलक पर्याय आहेत. मुंबई, पुण्यातील रहिवासी सेकंड होम किंवा एक भविष्यातील गुंतवणूक म्हणून नाशिककडे पाहू लागले आहेत. गेल्या १५ वर्षांमध्ये या भागाचा चेहरामोहरा चांगलाच बदलला आहे. त्यामुळे या भागापासून थेट नाशिक शहरापर्यंत लहान-मोठ्या विकासकांनी या ठिकाणी रो हाऊसेस, व्हिलाज अपार्टमेंट असे विविध प्रोजेक्ट सुरू केले आहेत. एकूणच शहराचा कायापालट होत आहे. मुंबई-नाशिक सहापदरी रोड सुरू झाल्याने सहा तासांचा होणारा प्रवास साडेतीन ते अडीच तासांवर येऊन ठेपला आहे.

घर घ्यायचे असेल तर सर्वसामान्य आणि विकासक नेहमीच कनेक्टिव्हिटीचा विचार करतो. रोड रेल्वे आणि एअर या कनेक्टिव्हिटीमुळे आता नाशिकला अधिकच महत्व आले आहे, मात्र कनेक्टिव्हिटीबरोबच उत्तम हवामानही मन रमायला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील अनेक बिल्डरांनी त्यांचे प्रोजेक्ट नाशिकमध्ये केले आहेत. कर्जतपासून अवघ्या एक-दीड तासांच्या अंतरावर असलेल्या नाशिकरोडवरच आता टुमदार घरे उभी करण्यात येत आहेत आणि ती घरे सेकंड होम म्हणून ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. तसेच इथले जीवनमानदेखील बदलेले आहे. सर्वसामान्य दुकानांपासून ते मोठे शॉपिंग मॉल्सपर्यंत विविध ऑप्शन या ठिकाणी तयार आहेत. नाशिक शहर हे समुद्र सपाटीपासून साधारणत: सातशे ते साडेसातशे फूट उंचीवर मुंबईतील दमट हवामानापेक्षा थंड आणि मोकळे, हवेशीर वातावरण देणारे शहर म्हणूनच ओळखले जाते.

- Advertisement -

मुंबईत समुद्राजवळ असल्याने याठिकाणी नेहमीच दमट आणि उष्ण हवामान असते. त्यामुळे मुंबईकर हैराण होऊन जातात. यालट नाशिक शहरात दिवसा कितीही ऊन असले तरी रात्री मात्र चांगली थंडी आणि मोकळी हवा वाहते. विकासाच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत नाशिक शहराचे नाव घेतले जाते. वर्दळीच्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते चार पदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. शहरातील गंगापूर रोड, मध्य नाशिक, नाशिक रोड यांसारख्या जास्त वर्दळीच्या ठिकाणी चार पदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नाशिकमधून बाहेर पडताना मुंबई-पुणे-जळगाव-सूरत आणि वणीला जाताना रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यातील विकासकांनी नाशिक शहराचा विचार करून मोठमोठे प्रोजेक्ट सुरू केले आहेत.

कर्जतहून थेट नाशिकला जोडण्यात येत असल्याने नाशिकमध्येही प्रॉपर्टी घेण्याकडे कल वाढत आहे. नाशिक शहराच्या कानाकोपर्‍यातही जाण्यासाठी सिटी बसेस, ऑटो रिक्षा आणि इतर वाहतुकीची व्यवस्था आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळच असून आता नाशिक एअर कनेक्टिव्हिटीनेदेखील जोडले जात आहे. नाशिक हे शिक्षणाचे मोहर घरच ओळखले जाते. शहरातील शैक्षणिक सुविधा देखील जास्त चांगल्या आणि दर्जात्मक असल्याने या शहरात जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मॅनेजमेंट कॉलेज इंजिनिअरींग कॉलेज मेडीकल कॉलेज लॉ कॉलेज अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज एव्हीएशन कॉलेज कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नलिझम कॉलेज तसेच आर्टस कॉर्मस आणि सायन्स कॉलेज जवळपासच्या अंतरावर आहेत. तसेच शहरात इंटरनॅशनल हायस्कूलचे प्रमाणही वाढले आहेत. नाशिक कसारा बससेवेने आणि तिथून लगेच लोकलने मुंबईला त्वरीत जाता येते. त्यामुळे जलद कनेक्टिव्हिटी आणि चांगल्या पायाभूत सुविधांमुळे नाशिकच्या विकासालाही चांगलीच गती प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

कर्जत – नाशिक दरम्यानच्या रस्त्यांवर २० ते ४० लाख रुपयांपर्यंत अलिशान घरे मिळतात. या ठिकाणी इमारतींमध्येही प्लॅटची किंमत साधारण १ बीएचकेसाठी १८ लाख, २ बीएचकेसाठी ३० लाख रुपये लागतात. या रकमेत सर्वसाधारण ग्राहकांना या ठिकाणी सेकंड होमसाठी प्रोपर्टी खरेदी करणे सहज शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -