घरफिचर्सआपला नैसर्गिक वारसा संकटात...

आपला नैसर्गिक वारसा संकटात…

Subscribe

याचे उदाहरण म्हणजे 1970 आणि 1980 च्या दशकामध्ये ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉनच्या रोन्डोनिया राज्यातील साफ केलेला प्रदेश. जमिनी मिळवण्याची इच्छा असलेले लोक त्यामध्ये येतात, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पर्जन्य वनाला साफ करतात, परकीय वनस्पती लावतात व परकीय प्राणी आणतात आणि अधिक अन्नासाठी जंगली प्राण्यांची शिकार करतात. अनेक स्थानिक प्रजाती दुर्मिळ बनतात आणि काही संपूर्णपणे नामशेष होतात. मानवाच्या लोकसंख्या वाढीची किंमत जगातील वनस्पती आणि प्राणीजीवन चुकवत आहे.

वन्य जीवनासाठीचे राष्ट्रीय मंडळ (एनबीडब्ल्यूएल) ही एक फारशी परिचित नसलेली ऑक्टोबर 2003 मध्ये निर्माण केली गेलेली स्वायत्त सरकारी संस्था आहे. हिची स्थापना सुधारित वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 2002 मधील तरतुदींतर्गत केली गेली होती आणि या मंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत. याचा उद्देश तीन राष्ट्रीय उद्याने आणि जैवविविधतेच्या विशेष स्थानांशी (हॉट स्पॉट्स) संबंधित योजनांचे पुनर्लेखन करणे हे आहे. एखाद्या क्षेत्राचे पुनर्लेखन (डिनोटिफिकेशन) करणे म्हणजे तो भाग आता संरक्षित क्षेत्र नाही आणि तो व्यापारी विकासासाठी वापरला जाऊ शकतो. पुनर्लेखन करण्यात येणारी तीन राष्ट्रीय उद्यानांमधील जैसलमेरजवळील वाळवंट राष्ट्रीय उद्यान, अरुणाचल प्रदेशातील निम्न सुबनसिरी नदीचे खोरे आणि पिठोरागढ, उत्तराखंडमधील असकोट मुस्क हरिण अभयारण्य यामुळे वृक्ष आणि वन्य प्राणी यांची निर्दय कत्तल होणार आहे. चौथ्या संरक्षित क्षेत्राचे भवितव्य- गोविंद राष्ट्रीय उद्यान- उत्तरकाशी, उत्तराखंड; जे हिमालयन पक्ष्यांच्या 150 दुर्मिळ प्रजातींचे घर आहे आजही अनिश्चित आहे.

‘भारत प्रगतीपथावर (इंडिया शायनिंग)’च्या काळात मृत्यूच्या वाटेवरील संकटात सापडलेल्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या आणि दलदलीच्या परिसरात राहणार्‍या ग्रेट इंडियन बुस्टर्ड, गंगेच्या प्रदेशातील डॉल्फिन, स्नो लिओपर्ड (बर्फ चित्ता), वाघ, मस्क हरिण, काळे बदक, क्लाउडेड लिओपोर्ड, स्नो लोरिस, हिमालयीन ताहर, मोनाल फिसन्ट, सिवेट मांजर, संगमरवरी मांजर, कॅप्ड लंगूर, गोल्डन महसीर, काळे अस्वल, वेस्टर्न ट्रॅगोपन, दाढीवाले घुबड, कॉमन सँडिपर प्रजाती अशा आहेत. स्थापनेपासूनच एनबीडब्ल्यूएल विकास क्षेत्र बनवण्याच्या नावाखाली आणि कॉर्पोरेट जगतातील लहरी/ इच्छा पूर्ण करण्याच्या नावाखाली उद्याने आणि अभयारण्ये यांच्या पुनर्लेखनासाठी रबरी शिक्का मारून अनुमती देऊन आपल्या नैसर्गिक वारशावरील हल्ला अत्यंत व्यापक आहे आणि आता निर्माण होणारा प्रश्न हा आहे की किती विकास पुरेसा म्हणता येईल? आणि तो विकास कोणासाठी विकास असेल?

- Advertisement -

बैजी हा एक आनंदी, ताज्या पाण्यातील डॉल्फिन आहे; जो एकेकाळी यांगत्से नदीच्या हजारो मैलांच्या परिसरात मोठ्या संख्येने राहात होता. आता तो जगातील नामशेष होण्याच्या मार्गावरील सर्वांत मोठ्या आकाराचा प्राणी आहे. गेल्या शतकातील वाढत्या प्रदुषणाच्या कचाट्यात सापडल्यामुळे आणि असीमित मासेमारीमुळे 1980 पर्यंत त्याची लोकसंख्या फक्त 400 इतकी उरली; 1993 मध्ये ती 150 झाली आणि आता 100 पेक्षा कमी आहे, की हा प्राणी वन्य प्रदेशात येत्या दशकात टिकेल का, याबद्दल प्राणीशास्त्रज्ञांना शंका आहे. बैजीचे नामशेष होण्यामधील सर्वांत जवळच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुमात्रान रहिनोसर्स (संभवत: 500 आज जिवंत असावेत) आणि चीनमधील जायंट पांडा (1000 पेक्षा कमी) हे आहेत.
जेव्हा या प्रजातींमधील अंतिम सदस्याचा मृत्यू होतो किंवा कॅलिफॉर्निया कॉन्डॉरप्रमाणे, ज्याला वनातून काढून एका बंदिस्त फलन कार्यक्रमात ठेवले गेले; तेव्हा आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो; की प्रसारमाध्यमे त्याची नोंद घेतील. परंतु, नामशेष होणार्‍या प्रत्येक प्राणी व्यक्तिमत्त्वाचे काय? जीवशास्त्रज्ञ वनस्पतींच्या आणि लहान प्राण्यांच्या हजारो प्रजातींची नावे सांगू शकतात; जी नुकतीच नामशेष झाली किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

जगातील सर्वांत दुर्मिळ पक्षी स्पिक्स मॅकाव आहे, मध्य ब्राझीलच्या जंगलातील नदी किनार्‍यांवर तळहाताएवढे असे फक्त एक किंवा दोन पक्षी आज आहेत. सर्वांत दुर्मिळ वनस्पती हवाईची कूकची कूकी आहे; जे एक लहान झुडूप आहे आणि त्याची फुले गडद नारिंगी- लाल रंगाची असतात. एकेकाळी या प्रदेशात मोलोकओई ज्वालामुखीचे शुष्क उतार होते. आज त्यातील फक्त अर्थे झुडुपे शिल्लक आहेत आणि त्यांच्या शाखा इतर संबंधित प्रजातींच्या समुहांवर आरोपित केल्या गेल्या आहेत. कूकचा कूकी या जीवशास्त्रीय तुरुंगातील शेवटचे काही दिवस जगत असेल. या झुडुपाला साहाय्य करण्याच्या संबंधित शास्त्रातील तज्ज्ञांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही जमिनीमध्ये पेरलेल्या कोणत्याही फांदीला मुळे फुटली नाहीत.
जगाभोवती जीन्सपासून प्रजातींपर्यंतच्या पर्यावरण व्यवस्थेसह पूर्ण विविधतेसह असलेले जीवन, अशी व्याख्या केली जाणारी जैवविविधता आज संकटात आहे. या समस्येला हाताळताना गेल्या दोन दशकांमधील संवर्धन तज्ज्ञांनी त्यांचे मुख्य लक्ष स्वतंत्र प्रजातींपासून संपूर्णपणे संकटात सापडलेल्या निवासस्थानावर (हॅबिटाट) केंद्रित केले; जे नष्ट झाल्यास अनेक प्रजाती नष्ट होतील. उदाहरणार्थ, अमेरिकेमधील अशा विशेष स्थानांमध्ये (हॉट स्पॉट) दक्षिण कॅलिफॉर्नियामधील किनार्‍याचा भाग येतो, फ्लोरिडामधील दलदलीचा प्रदेश येतो आणि अलाबामा आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमधील धरणे झालेल्या आणि प्रदूषित झालेल्या नदी व्यवस्थासुद्धा येतात. जगातील सर्वाधिक विशेषः स्थान असलेल्या देशांमध्ये इक्वेडोर, मादागास्कर आणि फिलिपाईन्स यांचा समावेश होतो; पण यावर एकमत नाही. प्रत्येक देशामध्ये त्याच्या समृद्ध पावसाळी जंगलातील दोन तृतीयांश किंवा अधिक वनाचा नाश झाला आहे आणि उरलेला भाग मोठ्या आक्रमणाचा सामना करत आहे.

- Advertisement -

तज्ज्ञ लोकांचे म्हणणे सरळ आहे. अशा क्षेत्रांमधील संवर्धनाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून कमीत कमी आर्थिक खर्चात जास्तीत जास्त जैव विविधतेला वाचवता येऊ शकते. जर प्रादेशिक नियोजनांतर्गत या प्रयत्नांना राजकीय प्रक्रियेचा भाग बनवता आले, तर जैवविविधतेचा बचाव करण्यास लोकांचे सर्वाधिक संभाव्य समर्थन मिळू शकेल.
या नोंद झालेल्या उदाहरणांची संख्या काहीच नाही. नामशेष होण्याचा एकूण दर ठरवणे दुर्दैवाने अत्यंत अवघड आहे. मोठ्या पक्ष्यांसारखे आणि सस्तन प्राण्यांसारखे काही गट हे इतरांपेक्षा नामशेष होण्यास जास्त संवेदनशील आहेत. एका किंवा दोन ताज्या पाण्याच्या प्रवाहापुरत्या मर्यादित असलेल्या माशांच्या बाबतीतही तसेच आहे. किटकांचे आणि लहान प्राण्यांमधील बहुतांश प्रजाती लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत अवघड आहेत; त्यामुळे त्यांची नेमकी संख्या कळू शकत नाही. परंतु, तरीही, विश्लेषणाच्या अनेक अप्रत्यक्ष वापरणारे जीवशास्त्रज्ञ सामान्यत: एकमत होतात, की जागतिक पातळीवर आणि कमीत कमी जमिनीवर होमो सेपिएन्सचे आगमन होण्याआधीच्या तुलनेत आज प्रजाती 100 पट वेगाने नामशेष होत आहेत.

उष्ण कटिबंधातील पर्जन्यावर आधारित वने हे या प्रकारच्या सर्वाधिक हानीचे क्षेत्र आहे. जरी एकूण जमीन असलेल्या पृष्ठभागांपैकी फक्त 6% भागात ते असले तरीही त्यांच्यामध्ये संपूर्ण जगात आढळणार्‍या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींपैकी अर्ध्या प्रजाती आढळतात. 1980 च्या दशकामध्ये पर्जन्यावर आधारित वने साफ होण्याचा आणि जळण्याचा दर दरवर्षी 1% होता; हे प्रमाण आयर्लंड या संपूर्ण देशाच्या आकारमानाएवढे आहे आणि विनाश होण्याची गती आता वाढत असावी. अशा निवासस्थानाची हानी झाल्यास ग्रहावरील राखीव जैव विविधता मोठ्या संकटात सापडते. याचा अर्थ दर वर्षी 0.25% किंवा अधिक वन्य प्रजाती तत्काल होणार्‍या किंवा लवकरच होणार्‍या नष्टचर्‍यामध्ये ढकलल्या जात आहेत. दराशिवाय हे प्रत्यक्ष संख्येच्या दृष्टीने किती असेल? जर आज बर्‍याच प्रमाणात मानवाने हस्तक्षेप न केलेल्या वनांमध्ये 10 दशलक्ष प्रजाती असतील, जे काही शास्त्रज्ञांचे मत आहे, तर वार्षिक नुकसान लाखोंमध्ये आहे. जर फक्त 1 दशलक्ष प्रजाती जरी असतील, तरी होणारे नुकसान हजारोंमध्ये आहे.

दिलेल्या नैसर्गिक निवासस्थानाचे क्षेत्र आणि त्यामध्ये राहण्यास सक्षम असलेल्या प्रजातींची संख्या यामधील संबंधांवर ही अनुमाने आधारित आहेत. ही अनुमाने कदाचित कमीच असतील. वस्तीस्थानाचे संपूर्णपणे होणारे उच्चाटन, हे नामशेष होण्यामागचे मुख्य कारण आहे. परंतु शिकार, वनस्पती आणि प्राण्यांच्या अतिरिक्त कापणीसह आक्रमक (एक्सोटिक) विदेशी पक्षी आणि त्यांच्यासह असलेले आजार हे विनाशाच्या प्रक्रियेमध्ये कारक म्हणून थोडेसेच मागे आहेत. हे सर्व घटक एकमेकांसह अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकारे काम करतात. जेव्हा असे विचारले, की कशामुळे कोणत्या विशिष्ट प्रजाती नामशेष होतात, तर जीवशास्त्रज्ञ ओरिएंट एक्स्प्रेसमधील खून अशा प्रकारचे उत्तर देण्याची शक्यता आहे.

त्या सर्वांनी ते केले. उष्णकटिबंधीय देशांमधील एक सर्वसाधारण क्रम ओसाड प्रदेशात रस्त्यांची उभारणी करण्यापासून सुरू होतो. याचे उदाहरण म्हणजे 1970 आणि 1980 च्या दशकामध्ये ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉनच्या रोन्डोनिया राज्यातील साफ केलेला प्रदेश. जमिनी मिळवण्याची इच्छा असलेले लोक त्यामध्ये येतात, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पर्जन्य वनाला साफ करतात, परकीय वनस्पती लावतात व परकीय प्राणी आणतात आणि अधिक अन्नासाठी जंगली प्राण्यांची शिकार करतात. अनेक स्थानिक प्रजाती दुर्मिळ बनतात आणि काही संपूर्णपणे नामशेष होतात. मानवाच्या लोकसंख्या वाढीची किंमत जगातील वनस्पती आणि प्राणीजीवन चुकवत आहे. जे मानवाचा समोरासमोरचा स्वार्थ सर्वाधिक महत्त्वाचा मानतात, त्यांना ही चुकवलेली किंमत स्वीकारार्ह वाटते.


-निरंजन वेलणकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -