घरफिचर्सते आले....ते एकवटले....ते जिंकले

ते आले….ते एकवटले….ते जिंकले

Subscribe

फ्रान्सने दुसर्‍यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशोम्प यांनी म्हटले की, "आम्ही मागील ४ वर्ष जे कष्ट केले, त्याचे फळ आज आम्हाला मिळाले आहे."

रशियात झालेल्या फुटबॉल विश्वचषकाचा थरार मागच्याच आठवड्यात संपला. या अंतिम सामन्यात क्रोएशियाला नमवत फ्रान्सने दुसर्‍यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशोम्प यांनी म्हटले की, “आम्ही मागील ४ वर्ष जे कष्ट केले, त्याचे फळ आज आम्हाला मिळाले आहे.” आपण जेव्हा एखादी सुंदर कलाकृती पाहत असतो तेव्हा त्यामागची मेहनत आपल्याला फार कमी वेळा माहित असते. जगज्जेत्याफ्रान्सच्यासंघाचेही तसेच काही आहे.
ब्राझील येथे२०१४ मध्येझालेल्या विश्वचषकात फ्रान्सला फार चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्यांना उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच पोहोचण्यात यश आले होते. उपांत्यफेरीत त्यांना त्यावेळच्या विश्वचषक विजेत्या जर्मनीकडून पराभवाला समोरे जावे लागले होते. या त्यांच्या पराभवामुळे देशोम्प यांच्यावर बरीच टीका झाली. अनेकांनी तर त्यांना प्रशिक्षकपदावरून काढावे असे सांगितले. मात्र, फ्रान्स फुटबॉल संघटनेने कोणतेही तडकाफडकी निर्णय घेतले नाही. त्यामुळे देशोम्प यांनी आपले प्रशिक्षकपद कायम ठेवले. मात्र, देशोम्प यांनी संघात बदल करायचे निर्णय घेतले. त्यांनी नव्या खेळाडूंना संधी द्यायचे ठरवले. देशोम्प यांनी नवा तरुण फ्रान्स संघ अँटोइन ग्रीझमन आणि पॉल पोग्बा यांच्यासहतयार करायचे ठरवले. त्यांना आपला संघ ’ एक ’ होऊन खेळावा असे वाटत होते.

मात्र, देशोम्प यांना हा नवा संघ उभारताना बरीच आलोचना झेलावी लागली. त्यातच २०१६ मध्ये त्यांनी रियाल मॅड्रिडचा स्टार स्ट्रायकर करीम बेंझेमाला काही कारणांमुळे संघातून वगळण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे बेंझेमासह इतरांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु, देशोम्प यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही. २०१६ मध्येच एनगोलो कांटे, अँटनी मार्शियाल यासारखे नवे खेळाडू या फ्रेंच संघात आले. त्यामुळे २०१६ मध्ये आपल्याच देशात झालेल्या युएफा यूरो स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांना पोर्तुगालकडून १-० असे पराभूत व्हावे लागले होते. मात्र, फ्रान्सच्या नव्या आणि तरुण संघाने आपण कोणाहीपेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले होते. तसेच, ग्रीझमन, पोग्बा, कांटे, माटवीडी, जिरुड यासारख्या खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केले. त्यामुळे फ्रेंच चाहत्यांच्या संघाकडून अपेक्षाही वाढल्या.
त्यातच २०१७ मध्ये किलीयन एम्बापेने ’मोनको’ या फ्रेंच क्लबकडून दमदार प्रदर्शन करत फ्रान्सच्या राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवला. त्याने मार्च २०१७ मध्ये आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पदार्पणाच्या वेळी तो फक्त १८ वर्षांचा होता. त्यामुळे तो फ्रान्ससाठी खेळणारा दुसरा सर्वात लहान खेळाडू ठरला. त्याचा हा प्रवेश संघासाठी हिताचा ठरला. एम्बापेने सुरुवातीपासूनच आपली जादू दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे २०१८ विश्वचषकात खेळण्यासाठी फ्रान्स संघ आकार घेऊ लागला. या संघात गोलरक्षक ह्यूगो लोरीस, राफेल वरान, एनगोलो कांटे, पॉल पोग्बा, किलीयन एम्बापे आणि अँटोइन ग्रीझमन हे प्रमुख खेळाडू म्हणून पुढे आले.

- Advertisement -

२०१८ विश्वचषकाच्या पात्रता फेरीत त्यांनी १० पैकी ७ सामने जिंकले. त्यामुळे विश्वचषकासाठी सर्वात आधी पात्र होणार्‍या देशांत फ्रान्सचा समावेश होता. या विश्वचषकासाठी संघ निवडताना देशोम्प यांनी तरुण लोकांना निवडण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. त्यांनी या संघातही बेंझेमाला न घेण्याचा निर्णय घेतला. तसेच मँचेस्टर युनायटेडकडून खेळणार्‍या अँटनी मार्शियाल यालाही वगळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. २०१८ विश्वचषकाच्या गट फेरीत त्यांना गट ’ क ’ मध्ये डेन्मार्क,पेरू आणि ऑस्ट्रेलिया या संघांशी दोन हात करावे लागले. पहिल्यासामन्यातऑस्ट्रेलियाला कसेबसे हरवले पण पुढे त्यांनीपेरूचाही पराभव केला. तर बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात त्यांनी बलाढ्य अर्जेन्टिनाचा रंगतदार सामना खेळत

४-३ असा पराभव केला होता. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी उरुग्वेचा पराभव केला. याचफेरीत त्यांनी बेल्जियमलाही धूळ चारली. अंतिम फेरीत त्यांचा सामना या स्पर्धेचे ’ सरप्राइझ पॅकेज ’ क्रोएशियाशी झाला. या सामन्यात त्यांनी क्रोएशियाला हरवत तब्बल२० वर्षांनी विश्वचषकावर नाव कोरले. या विश्वचषकात १९ वर्षीय किलीयन एम्बापेला सर्वोत्तम ’ तरुण ’ खेळाडूचा खिताब मिळाला. त्यामुळे फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशोम्प यांनी ४ वर्षांपूर्वी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे फळ त्यांना आता मिळाले असे म्हणता येईल.

- Advertisement -

माजी इटालीयन प्रशिक्षक अँटोनियो कोंटे याचे एक सुंदर वाक्य आहे. तेम्हणतात, “प्रशिक्षक हा एखाद्या शिंप्याप्रमाणे असला पाहिजे. शिंप्याला जसे वेगवेगळ्या व्यक्तीच्या अंगकाठीप्रमाणे कपडे शिवता यायला हवे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रशिक्षकाला आपल्याकडे ज्याप्रकारचे खेळाडू आहेत, त्याचप्रकारची खेळरचना आखता आली पाहिजे.” आणि हेच फ्रान्सचे प्रशिक्षक देशोम्प यांना योग्य लागू होते. २०१४ मध्ये जेव्हा रेबेरी, बेंझेमासारखे खेळाडू होते तेव्हा त्यांना योग्य अशी खेळरचना देशोम्प यांनी आखलेली. मात्र, २०१८ विश्वचषकात देशोम्प यांनी तरुण खेळाडूंना एकवटून त्यांच्याशीसाजेशी खेळरचना आखली आणि हा विश्वचषक जिंकला.त्यामुळे देशोम्प आणि फ्रान्सच्यासंघाविषयी एकच म्हणता येईल, ’ते आले…ते एकवटले आणि ते जिंकले!’


– अन्वय सावंत
(लेखक ’आपलं महानगर’चे प्रतिनिधी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -