घरफिचर्सगर्भ : युद्ध खोडून सकारात्मकतेचे सृजन

गर्भ : युद्ध खोडून सकारात्मकतेचे सृजन

Subscribe

माझ्या गर्भ नाटकातील वरील संवाद देशातील सद्यस्थितीला पूरक आहेत. कारण एकंदरीतच सध्या देशात युद्धाची खुमखुमी वाढत चालली आहे, असं दृश्य दिसते. युद्ध व्हावे कि नाही या संदर्भातील मतभिन्नतेच्या बाबी देखील आपल्या समोर येत आहेत. राजकीय हेवेदावे, युद्ध नितीबाबत वादविवाद, आरोप प्रत्यारोप या सगळ्या आधी थोडं मागे जाऊन विचार करूयात...

युद्ध युद्ध युद्ध, गिद्ध गिद्ध नोचते हैं जिंदा मांस
चिल कौंवे तार तार करते हैं जीवन को
युद्ध होता है शांति के नाम पर, सभ्यता के नाम पर,
मानवता को बचाने के नाम पर होता है युद्ध !

आपणा सर्वांनाच युध्दाचा रक्तरंजित इतिहास ठाऊकच आहे, कधी धर्माच्या स्थापनेसाठी युद्ध झालीत तर कधी साम्राज्याच्या विस्तारासाठी तर कधी शत्रूला नमविण्यासाठी युद्ध झाली आहेत. या युद्धाची भीषणता आणि भयाणता काय असते हे देखील आपण ऐकले व वाचले आहे, काहींनी तर अनुभवले ही आहे. सारे काही बेचिराख होऊन कितीतरी पिढ्यांना या युद्धाच्या दाहकतेतून जावे लागते. या युद्धातून विध्वंसापलीकडे काहीच साध्य होत नाही, मग कशासाठी करतो आपण हे युद्ध ?
असे म्हणतात कि, मानवतेला वाचवण्यासाठी युद्ध करतात पण युद्धात मानवतेचाच बळी जातो. पाहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध ! पण या युद्धांतुन निष्पन्न काय झाले, मानवीयतेचा विनाश आणि कधीही न भरून निघणार कालांत! तरीही आपल्याकडे युध्दाच्या वाच्यता होतच आहेत. या परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, युद्ध करणे इतकं सोपे आहे का ? युद्धाची संकल्पना देशाची प्रगती करणारी आहे का ? युद्धाचा विचार खरंच मानवीय आहे का ? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.

- Advertisement -

युद्धाचा विचार जरी क्षणिक असला तरी त्याचे पडसाद किती तरी काळ उमटत राहतात हेही तितकेच महत्त्वाचे. वर्तमान परिस्थितीत युद्ध व्हावे किंवा नाही याच्या पलीकडे जाऊन, युद्धाची विभिषिका खोडून जीवन आणि जग किती सुंदर आहे, हा भाव निर्माण करणारे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित नाटक गर्भ !

गर्भ नाटक आजच्या युगात जिथे माणुसकी लोप पावत चालली आहे, जिथे चंगळवाद आणि द्वेषाच्या चढाओढीत मानवतेचा र्‍हास होत चालला आहे, तिथे माणुसकीचा भाव जागवते. माणसाच्या माणूस होण्याच्या संघर्षात, नाटक गर्भ हरवत चाललेल्या मानवीय संवेदनांना स्पर्श करते. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या जीवन प्रवासात माणुसकीचा शोध घेते.
अखंड ब्रम्हांड हे लौकीकतेने संपन्न आहे आणि पृथ्वीची निर्मिती याच लौकीकतेने परिपूर्ण अशा प्राकृतिक तत्वांनी झाली. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांपासून सृजित माणसाचा सुंदर जन्म ! त्याच्या समोर निसर्गाचे सौंदर्य , अगणित अवकाश आणि असंख्य स्वप्न असतात, पण जस जशी त्याची वाढ होते, हळू – हळू त्याला एका चौकटीत बसवले जाते आणि बेमालूमपणे त्याच्याभोवती भाषा , धर्म , देश , संस्कृती, समाज याचे जाळे तयार केले जाते. थोडक्यात त्याचे कन्डीशनिंग केले जाते.

- Advertisement -

त्याचा विळखा इतका घट्ट होत जातो की, माणसाचे रूपांतर एका हिंसक पशुमध्ये होते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या जात , रुढीवादी परंपरा, उदारमतवादी विचार, दहशतवाद, वर्णवाद, धर्मांधता हे देखील या पशू सोबत जन्म घेतात. मानवी मूल्य, मानवी संवेदना यावरच आघात केला जातो आणि तिथून सुरुवात होते अराजकतेची ज्याचा परिणाम आहे द्वेष आणि सूड घेण्याची प्रवृत्ती.

नाटक गर्भ हे माणसाला निसर्गाच्या जवळ नेते. माणूस जेव्हा निसर्गाच्या जवळ जातो, तेव्हा तो निसर्गाच्या प्रत्येक जाणिवेला स्वतःच्या आत पाहतो. जशी प्रकृती बाहेर आहे तशी प्रकृती माणसाच्या आत ही आहे. नाटक गर्भ माणसाच्या आतील प्रकृतीला, प्राकृतिक तत्वांना जिवंत करून विकारी वृत्तीतून बाहेर काढते. नाटक आयुष्यात उतरते याचा अनुभव मी या गर्भ नाटकाच्या प्रक्रियेत घेतला, सर्वात आधी एक माणूस म्हणून स्वतःकडे पाहायला शिकले.या नाट्य प्रक्रियेत विचारांची खोली आणि वैचारिक प्रगल्भता वाढली. गर्भ नाटकाने आम्हा कलाकारां सोबतच प्रेक्षकांना देखील माणूस म्हणून घडवले. समाजाने निर्माण केलेल्या कोषांना भेदून प्रत्येक व्यक्तीला गर्भ नाटकाने उन्मुक्तता प्रदान केली आहे.

जेव्हा कलेशी आपण एकरूप होतो, तेव्हा कला आपल्या आतील न्यूनगंड बाहेर काढून कलाकाराला उन्मुक्त करते. प्रेक्षकांना ती उत्तम अदाकारी वाटतेच पण तेव्हा कलाकार कलात्मकता आणि कला साधनेच्या एका उंच शिखरावर असतो. अशी कलाकृती पहिल्या नंतर माणूस , प्रेक्षक जगातील संतापातून बाहेर पडतो . माणसात विकार असले की न्यूनगंड निर्माण होतो, त्यातून द्वेष ,प्रतिशोध या हीन प्रवृत्ती माणसाला वर्चस्ववादी होण्यास प्रवृत्त करतात व माणूस, सत्ताधीश युध्दाकडे वळतो. युद्धात होतो विनाश, विध्वंस,अशाच प्रकारे युद्धात नंतर कितीतरी काळ अंधकार असतो.
अशावेळेस गर्भ नाटकातील ‘खूबसुरत है जिंदगी’ चा सूर आत्मीय मानवी जीवनाचा आशावाद निर्माण करतो व प्रेक्षकांच्या माध्यमातून समाजात माणुसकीला तरंगीत करत राहतो.

नाटक गर्भ ने प्रेक्षकांना हि उन्मुक्त केले आहे. याचे उदाहरण असे – अमेरिकी बंडखोर गायक पीट सीगर हा आयुष्यभर साम्राज्यवादाच्या विरोधात होता, रंगभेद आणि वंशभेदाचा कठोर टीकाकार होता, जगातील सर्वाधिक प्रसिद्ध गाणे ‘वुई शॅल ओव्हरकम वन डे ’च्या अमर रचनाकाराच्या मृत्युच्या शोकांतिकेत एक प्रेक्षक अस्वस्थ होतो.

नाट्यनुभुतीतील स्पंदनं, विचार, प्रश्न, भावना आणि अस्तित्वाचा संघर्ष या सर्व पैलुंना स्पर्श करत प्रेक्षक स्व अवलोकन करत असतो. खरंतर आपल्या स्वप्नांना वास्तविकतेच्या आधारावर आव्हान देणे आणि ते प्रत्यक्षात आणणे हेच खूप मोठे आव्हान आहे. स्वप्नांना पूर्ण करण्याचे प्रोत्साहन, आव्हानांशी लढण्याचे बळ, संघर्षाचा आनंद आणि जिंकल्याचे समाधान या सर्वच स्तरांवर प्रेक्षक स्वतःला पाहतो आणि भावनात्मक तसेच मानसिक स्तरावर उन्मुक्त होतो. एका माणसाच्या मनापासून दुसर्‍या माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणजे संवाद तर माणसाला माणसाशी जोडणारे तत्व आहे प्रेम, जगात असा कुठलाच मुद्दा नाही, कुठलीच अशी बिकट परिस्थिती नाही जिचे संवाद आणि प्रेमाने निरसन होऊ शकत नाही. गर्भ हे नाटक संवाद आणि प्रेम ही तत्वे रुजवण्याचा प्रयत्न करते. गर्भ एका उत्प्रेरकाची भूमिका निभावते, ज्यातून कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांतीचा उदयाचा मार्ग प्रश्न होईल. हे नाटक याच सांस्कृतिक क्रांतीचे दिवास्वप्न आहे.

सायली पावसकर (रंगकर्मी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -