घरताज्या घडामोडीHealth Tips : टरबूजाच्या बिया आहेत फायदेशीर, चला जाणून घेऊ या

Health Tips : टरबूजाच्या बिया आहेत फायदेशीर, चला जाणून घेऊ या

Subscribe

Health tips | टरबूजाच्या बिया आहेत फायदेशीर, चला जाणून घेऊ या

टरबूज (Watermelon) हा हंगामी फळ आहे. टरबूज हे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. टरबूजचं फक्त उपयुक्त असून त्याच्या बिया उपयुक्त आहे. त्यामध्ये अनेक गुणधर्म असून ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये (Vitamins A,C,E) व्हिटॅमिन ए, सी, ई, मॅग्नेशियम हे पोषक घटक आढळतात. ही पोषक तत्वांमुळे शरीरातील समस्या दूर होतात.
टरबूजाच्या बियांचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. चला जाणून घेऊ या.

- Advertisement -

1. दृष्टी सुधारणे

टरबूजांच्या बिया डोळ्यांसाठी गुणकारी आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन (Carotene) भरपूर प्रमाणात असते. टरबूजांच्या बियांमुळे मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो. याबरोबरच डोळ्यांची दृष्टी सुरक्षित राहते.

- Advertisement -

2.रक्तदाबाचा धोका कमी

टरबूजाच्या बिया पोटॅशियम (Potassium)युक्त आहेत. रक्तदाब कमी करण्यासाठी पोटॅशियम युक्त आहार घेतला पाहिजे.

3. रोगप्रतिकारकशक्ती वाढते

टरबूजांच्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. शरीरात व्हिटॅमिन सी (Vitamins C) मुबलक प्रमाणात राहण्यासाठी टरबूजाच्या बियांचे आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.

4.गरोदरपणामध्ये फायदेशीर

टरबूजाच्या बिया फोलेटसाठी उत्तम असल्याने ते शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकतो. यामुळे गरोदर (Pregnant) महिलांमध्ये पाणी टिकून राहण्याची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी टरबूजाच्या बिया फायदेशीर ठरतात. . मात्र, गरोदरपणात तज्ज्ञांच्या सल्ल्या घेऊनच याचे सेवन करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -