हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्याला खूप महत्व दिले जाते. चैत्र पौर्णिमेला श्री हनुमानांचा जन्म झाला होता. संपूर्ण भारतात या दिवशी भगवान हनुमानांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा 6 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केला जाणार आहे. यादिवशी हनुमानांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे.
हनुमान चालिसेचे पठण केल्यास होते सर्व संकटांचे निवारण
- हनुमान चालिसाचे अनेकजण नियमीत पठण करतात. असं म्हणतात की, हनुमान चालिसाच्या पठणाने व्यक्तीला मन शांती मिळते शिवाय त्याच्यावर येणारे प्रत्येक संकट नाहीसे होते.
- दररोज हनुमान चालिसा पठण केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते, आरोग्य सुधारते.
- हनुमान चालिसाचा पाठ केल्यास वाईट आणि भीतीदायक स्वप्न आणि विचार दूर होतात.
- हनुमान चालिसाचा पाठ केल्यास मनातील वाईट विचार दूर होतात.
- हनुमान चालिसाचा पाठ केल्यास मंगळ आणि शनीचे अशुभ परिणाम नष्ट होतात.
हनुमान चालिसाचा पाठ करताना करा ‘या’ नियमांचे पालन
- हनुमान चालिसाचा पाठ करताना तुमचे मन शांत असायला हवे. त्यावेळी फक्त हनुमान चालिसेवरच लक्ष केंद्रीत असावे.
- हनुमान चालिसाचे पठण करताना आजूबाजूची जागा स्वच्छ आणि शुद्ध असावी.
- हनुमान चालिसाचे पठण एका जागेवर बसूनच करावे.
- हनुमान चालिसाचे पठण तुम्ही मंदिर, घर किंवा तीर्थ स्थळांवर देखील करु शकता.
- हनुमान चालिसाचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
- हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी दीवा प्रज्वलित करा.