घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार २६ एप्रिल २०२४

राशीभविष्य : शुक्रवार २६ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – घरातील कामात धावपळ वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. मनावर दडपण येईल. प्रवासात सावध रहा. वाहन जपून चालवा.
वृषभ – अडचणीमधून मार्ग शोधता येईल. प्रयत्नाने तुमच्या कामात यश मिळू शकेल. अहंकारी भाषा वापरू नका.
मिथुन – कामात तणाव, वाद होण्याचा संभव आहे. संयमाने वागा. रागावर ताबा ठेवा. कोर्ट केसमध्ये यश मिळेल.
कर्क – धंद्यात जम बसेल. मागील थकबाकी वसूल करा. मनाप्रमाणे चांगल्या घटना घडतील. मनाची एकाग्रता होईल.
सिंह – घरात किरकोळ अडचणी येतील. नातेवाईक मदत करतील. कोर्टाच्या कामात मतभेद होतील. खर्च वाढेल.
कन्या – वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागल्यास तुमचे काम त्यांच्याकडून करून घेता येईल. अधीर होऊ नका. यश मिळेल.
तूळ – धंद्यात जम बसेल. वाढ होईल. मान-सन्मानाच्या योग येईल. अचानक शुभ समाचार मिळेल. पाहुणे येतील. परिचय होईल.
वृश्चिक – मन अस्थिर होईल. मोठ्या लोकांचा सहवास घडेल. नम्रतेने बोला व वागा. शेअर्सचा अंदाज घेताना घाई नको.
धनु – घरातील सदस्यांसोबत गैरसमज होईल. वाद वाढेल. शांततेतून मार्ग काढा. फाजील आत्मविश्वास ठेवू नका.
मकर – क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. मान-सन्मानाच्या योग येईल. धंद्यात सुधारणा होईल. नवीन परिचय होईल.
कुंभ – कठीण कामात यश मिळेल. कोर्टाच्या कामात हुशारी ठेवा. घरातील कामे मार्गी लागतील. धंद्यात फायदा होईल.
मीन – स्पर्धा जिंकता येईल. मोठे परिचय होतील. धंदा वाढेल. नोकरीत लाभ होईल. मनाप्रमाणे घटना घडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -