राशीभविष्य: सोमवार १८ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : धावपळ होईल. तुमच्या कामात अडचणी येतील. प्रतिष्ठेवर टीका होईल. विरोध वाढेल. प्रकृती सांभाळा.

वृषभ : घरगुती वाद जास्त वाढवू नका. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. धंद्यात दुर्लक्ष नको.

मिथुन : नको असलेली व्यक्ती तुमचा वेळ घेईल. एखाद्या कामासाठी तुमची मदत मागेल.

कर्क : सामाजिक कार्याला दिशा मिळेल. जोमाने काम करा. प्रसिद्धी मिळेल. आजचे काम ठेऊ नका.

सिंह : क्षुल्लक तणाव व गैरसमज होईल. व्यक्तीची पारख करताना चूक होण्याचा संभव आहे.

कन्या : तुमच्या कामाचे क्षेत्र वाढेल. पैसा मिळेल. स्पर्धा जिंकाल. पुरस्कार व मान मिळेल.

तुला : आर्थिक तणाव कमी होईल. तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील.

वृश्चिक : घरगुती कामे करावी लागतील. प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढवा.

धनु : चुकीच्या व्यक्तीचा सल्ला मानू नका. धंद्यात नवी दिशा मिळेल. नोकरीत काम वाढेल.

मकर : महत्त्वाची भेट घेऊन त्यावर चर्चा यशस्वी करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष चमकाल.

कुंभ : कठीण काम करून घ्याल. प्रेमाची माणसे भेटतील. साहित्याला नवा विषय मिळेल. नवीन ओळख होईल.

मीन : घरगुती तणाव होऊ शकतो. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. धंद्यात सावधपणे काम करा. हिशोब करा.