Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार १९ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : शनिवार १९ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : तुमच्या कार्याला आर्थिक मदत मिळवता येईल. कला क्षेत्रात कल्पनाशक्ती प्रभावी ठरेल. चिंतन कराल.

वृषभ : अधिकाराचा वापर योग्य कामासाठी करता येईल. घरातील कामे वेळच्या वेळी करा. धंदा चतुराईने करा.

- Advertisement -

मिथुन : घरातील वरिष्ठ माणसाची काळजी वाटेल. धंद्यात बोलणी करताना संयम ठेवा. नोकरीत मर्जी राखा.

कर्क : घरातील वाटाघाटीत सहभाग घ्यावा लागेल. प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. धंद्यात गोड बोलून रहा.

- Advertisement -

सिंह : राजकीय कारस्थाने नकोशी वाटतील. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. घरातील कामे होतील. कामगारांना सांभाळा.

कन्या : तणाव कमी होऊन घरगुती प्रश्न सोडवता येईल. राजकारणात तुम्हाला स्थान मिळू शकेल. लोकांचे सहाय्य मिळेल.

तूळ : रस्त्याने चालताना काळजी घ्या. राग अनावर होऊ शकतो. मनाविरुद्ध काम करण्याची वेळ येईल. मित्र मदत करेल.

वृश्चिक : घरातील कामे होतील. नोकरीत चांगला बदल करता येईल. धंद्यात वाढ करू शकाल. रागावर ताबा ठेवा.

धनु : सोपे वाटणारे कामसुद्धा कठीण होऊ शकते. नोकरीत काम वाढेल. बोलण्यात सावध रहा. वस्तू सांभाळा.

मकर : महत्त्वाचे काम करून घ्या. मैत्री सांभाळावी लागेल. प्रतिष्ठा मिळेल. लोकांची कामे करता येतील.

कुंभ : योजनांना गती मिळेल. घरातील कामे करून घेता येतील. नातलगांच्या सहवासात रहाल. वाहन खरेदीचा विचार कराल.

मीन : डोळ्यांची काळजी घ्या. आनंदाच्या भरात एखादी गोष्ट उघड कराल. धंद्यात लक्ष द्या. फायदा होईल.

- Advertisment -