राशीभविष्यः १६ सप्टेंबर २०२१

Horoscope, daily horoscope Tuesday 21 september 2021
राशीभविष्यः मंगळवार २१ सप्टेंबर २०२१

मेष :- मनावरील दडपण कमी होईल. संतती व जीवनसाथीच्या मदतीने एखादी समस्या कमी होऊ शकते. धंद्यात चांगली बातमी मिळेल.

वृषभ :- स्वतःच्या स्वार्थासाठी घरातील व्यक्तींना त्रास दिल्यास समस्या वाढतील. प्रवासात सावध रहा. कायद्याला तुच्छ समजू नका.

मिथुन :- चिंता कमी होईल. धंद्यात जास्त लक्ष द्यावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. वाद व तणाव निवळेल.

कर्क :- पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल. धंद्यातील थकबाकी वसूल करा. प्रयत्नाने किचकट कामात यश मिळवता येईल. नम्रता ठेवा.

सिंह :- आपुलकीच्या भावनेने बोलल्यास घरातील तणाव व वाद मिटवता येईल. इतरांच्या वाटाघाटीबद्दल जास्त अपेक्षा आहेत हे समजून घ्या.

कन्या :- धंद्यात जम बसेल. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात संधी शोधता येईल. गोड बोलून तुमचे ध्येय गाठता येऊ शकते. योग्यतेच करा.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था येईल. अतिविचार केल्यास कामाची वेळ पुढे निघून जाईल. महत्वाचा फोन येईल. मान-सन्मानाचा योग येईल.

वृश्चिक :- अस्थिरता ठेवल्यास समोर असलेल्या कामात एकाग्रता ठेवता येणार नाही. चूक होण्याची शक्यता आहे. चीडचीड वाढू शकते. शांत रहा.

धनु :- उत्साहवर्धक वातावरण राहील. स्पर्धा जिंकता येईल. वरिष्ठ खूश होतील. काम करण्याचा चंगळ गूड राहील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर :- ठरविलेल्या वेळेनुसार काम पूर्ण करू शकाल. नवीन परिचय होईल. खरेदी करण्यास जाता येईल. प्रवासात आनंदी व्हाल. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ :- घरातील माणसांचा गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. स्पर्धा जिंकण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. प्रवास करावा लागेल.

मीन :- धंद्यात फायदा होईल. प्रवासात घाई नको. कायद्याचे पालन करा. क्षुल्लक वाद वाढवू नका. प्रकृतीची काळजी घ्या.