Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य जाणून घ्या तुमचे राशीभविष्य - ८ ते १४ जुलै

जाणून घ्या तुमचे राशीभविष्य – ८ ते १४ जुलै

जाणून घ्या हा आठवडा कोणत्या राशीसाठी फलदायी जाणार आहे तर कोणत्या राशीसाठी कठीण जाणार आहे.

Related Story

- Advertisement -

मेष – 
सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग व चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. घरातील वातावरण उत्साही राहील. त्यामुळे मनावरील ताण कमी होईल. धंद्यात मोठे काम ओळखीतून मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्याला दिशा देता येईल. सरकारीवर्गाचे सहकार्य चांगले मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करू शकाल. बेकारांना नोकरी लागेल. पोलीस खात्यातील संशोधन कार्याला योग्य वळण मिळेल. कठीण असलेले काम करून घेता येईल. विद्यार्थी वर्गाला नव्या अभ्यासक्रमात रस वाढेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. कोर्ट केस असल्यास लवकर संपवा. कला-क्रीडा-साहित्यात नाव होईल.

 शुभ दि. ९, १०

- Advertisement -

वृषभ –

चंद्र शुक्र केंद्र योग व चंद्र, बुध लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार मनावर दडपण राहील. घरगुती वाद जास्त वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. संयमी स्वभावामुळे वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. पोलीस खात्यातील व्यक्तींना दर्जेदार काम करण्याची संधी मिळेल. किचवाट कामात यश मिळेल. धंद्याला वाढवता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला मेहनत घेतल्यास चांगलेच यश मिळेल. कोर्टाच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कला-क्रीडा-साहित्याला चालना मिळेल व प्रगतीची संधी मिळेल. मैत्र-मैत्रिणी बेत ठरवाल.

- Advertisement -

शुभ दि. ११, १२

मिथुन – 

सूर्य प्लुटो प्रतियुति व शुक्र, हर्षल त्रिकोण योग होत आहे. तुमचा उत्साह व महत्त्वाकांक्षा यामुळे कोणत्याही क्षेत्रातील अवघड काम करण्यात दणदणीत यश मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला अधिकार मिळतील. तुम्ही केलेल्या योजना पूर्ण होतील. कुठेही वेळ न घालवता योग्य तेच कार्य करा. पोलीस खात्यातील विशेष कामगिरी पार पाडता येईल. घर, वादन, जमीन, दुकान इ. खरेदी करू शकाल. मंगळवारी तणाव होऊ शकते. प्रवासात सावध रहा. विद्यार्थी वर्गाला मनाप्रमाणे यश मिळवता येईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धी व पैसा मिळेल.

शुभ दि. १३, १४

कर्क –

बुध, गुरु केंद्रयोग व चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सध्याच्या सुरुवातीला धंद्यातील निर्णय घेता येईल. नवीन भागिदार मिळू शकेल. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होण्याची शक्यता आहे. राजकीय-सामाजिक कार्यात कोणतेही विधान करताना, बोलताना सावध राहा. तुमचा राग वाढेल. अशी घटना सप्ताहाच्या शेवटी गुरूवारी घडू शकते. वरिष्ठांबरोबर मतभेद होतील. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे तुमची कल्पना व्यक्त करण्यात अडचणी येतील. मित्र मदत करतील, विद्यार्थी वर्गाने मोठ्यांशी नम्रतेने वागावे, कोर्टकचेरीच्या कामात मोठ्या व्यक्तीचे सहाय्य मिळणे कठीण आहे.

शुभ दि. ८,९

सिंह –

सूर्य, चंद्र लाभयोग व बुध नेपच्यून बराष्टक योग होत आहे. व्यवसायात अडचणींवर उपाय शोधता येईल. मार्ग सप्ताहाच्या सुरुवातीला मिळू शकेल. घरात, मुले, जीवनसाथी यांच्याशी संवाद साधता येईल. घर, वाहन, दुकान इ. खरेदी करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा निश्चयी स्वभाव सर्वांना दिसेल. शनिवारी तुमच्यावर दबाव येऊ शकतो. कोर्ट केससंबंधी काम या सप्ताहात पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात मनाप्रमाणे प्रगति होईल. परदेशात नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाने चांगले मित्र शोधून ठेवावे.

शुभ दि. ९, १०

कन्या –

चंद्र, मंगळ त्रिकोण योग व चंद्र बुध लाभयोग होत आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाने तुम्ही अधिक हुशारीने वागाल तर तुमचे वर्चस्व दिसून येईल. राजकीय-सामाजिक कार्यात बोलताना काळजी घ्या. निष्कारण गैरसमज नको. तुमच्यावर जनतेचा विश्वास आहे. हे तुम्हाला पुन्हा सिद्ध करावयाचे आहे. प्रगतिची संधी सोडू नका. घरातील माणसे तुमची काळजी म्हणून काही सूचना करतील. तुम्ही प्रेमाने समजून घ्या. क्रीडा क्षेत्रात चमकाल. कला क्षेत्रात तणाव होऊ शकतो. पळवाट दाखवणार्‍या विरुद्धलिंगी व्यक्तीमुळे अडचणी वाढतील. विद्यार्थी वर्गाला उत्साह राहील. पण सावध रहा.

शुभ दि. १०, ११

तुळ –

सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग व चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला दगदग होईल. मनाची द्विधा अवस्था होईल. नातलगांच्या सहवासात राहाल. राजकीय-सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. भेट व चर्चा करण्यात उत्साह राहील. घर, वाहन खरेदीचा विचार कराल. नोकरीत प्रगतिची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात धाडसी वृत्तीचे कौतुक होईल. नवीन ओळखीचा उपयोग होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. केस चालू असल्यास त्यात सुधारणा होईल. विद्यार्थी वर्गाला अधिक चांगल्या प्रकारे यश मिळवता येईल. संतत्ती प्राप्तीच्या ध्यान करता येईल.

शुभ दि. १२, १३

वृश्चिक –

चंद्र, मंगळ, त्रिकोणयोग व चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. धावपळ जास्त करण्याची वेळ येईल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो. नोकरीत करकरी होतील. इतरांच्या सांगण्यावरून कोणताही वाकडा निर्णय घेऊ नका. साडेसाती सुरू आहे. राजकीय-सामाजिक कार्यात अहंकाराने कोणतेही कृत्य केल्यास प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळण्यात विलंब होईल. जिद्द ठेवा, कोर्ट केस असल्यात योग्य सल्ल्यानेच मत मांडा. मौल्यवान खरेदी करताना वेंधळेपणा व उतावळेपणा करू नका.

शुभ दि. १०, १४

धनु –

सूर्य प्लुटो प्रतियुति व शुक्र हर्षल त्रिकोण योग होत आहे. चिंता व भलताच विचार मनात येईल. अस्थिरवृत्तीने उदास वाटेल. तुमच्या कामात मन रमवा. प्रगतिची संधी शोधा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा राहील. बोलणे कठोर होऊ देऊ नका. इतरांचे विचार ऐकून घ्या. वरिष्ठांच्या बरोबर महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करता येईल. कोर्टाची केस कशी संपवता येईल. त्यावर विचारविनिमय करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगति होईल. कौतुक होईल. किरोकळ दुखापत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने धरसोड वृत्ती न ठेवता अभ्यास करावा. चांगली संगत ठेवावी.

शुभ दि. ८, १२

मकर –

चंद्र, बुध, केंद्र योग व चंद्र गुरु प्रतियुति होत आहे. कटकटीचा व तणावाचा सप्ताह असेल. संयमाने मार्ग मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढत असलेले पाहून तुमच्या कार्यावर टीका होऊ शकते. तुम्ही लोकांसाठी कार्य करत आहात. या मुद्यावर ठाम असल्याने पुढे जाल. चौकसबुद्धी व सामाजिकपणा यावरच यश मिळते. घरात मतभेद व वाद होतील. धंद्यात सावध रहा. काम मिळेल ते घ्या. कोर्टाच्या कामात अडथळे येईल. नोकरीत कामामध्ये चूक करू नका. वरिष्ठांच्या मतांचा आदर करा. विद्यार्थी वर्गाने संतापाच्या भरात कायदा मोडू नये.

शुभ दि. १०, १४

कुंभ –

सूर्य नेपच्यून त्रिकोण योग व चंद्र शुक्र, लाभयोग होत आहे. घरातील ताण कमी झाल्याने उत्साह वाढेल. महत्त्वाचे कोणतेही काम सप्ताहाच्या सुरुवातीला करून घ्या. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात भरपूर मेहनत घेतल्यास मनाप्रमाणे यश मिळेल. दौर्‍यात लोकप्रियता मिळेल. पूर्वी केलेल्या चूका सुधारून नव्याने कामाल लागा. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. नवीन दर्जेदार परिचय उत्साहवर्धक ठरेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला योग्य दिशा मिळेल. वाहन चालवताना शनिवारी सावध रहा.

शुभ दि. ८, ९

मीन –

चंद्र, मंगळ त्रिकोणयोग व चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. कमतरता असल्यास दूर करता येईल. घरातील समस्या व नातलगांच्या अडचणींसाठी वेळ व पैसा खर्च होऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात वरिष्ठ सांगतील तेच काम व्यवस्थित करा. संधीची वाट पहा. नोकरीत किरकोळ अडचणींवर मात करू शकाल. कोर्टाच्या कामात अरेरावीची उत्तरे देऊन चालणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात मैत्रीमध्ये दुरावा संभवतो. स्वतःच्या खाण्या-पिण्याची सवय बदलण्याची वेळ येऊ शकते. विद्यार्थी वर्गाने लक्ष देण्यापेक्षा ध्येयावर लक्ष द्यावे.

शुभ दि. ९. १०

- Advertisement -