Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य जाणुन घ्या राशीभविष्य २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

जाणुन घ्या राशीभविष्य २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

Related Story

- Advertisement -

राशीभविष्य- २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर

मेष ः- तुला राशीत शुक्र प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यामध्ये सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ अडचणी येतील. घाई करू नका. वाद वाढवू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्ही तुमचे मुद्दे तुमच्या पद्धतीने सर्वांना पटवून द्या. तुमची प्रतिष्ठा राखली जाईल. शनिवारी तुम्हाला चांगली बातमी मिळेल. घरातील ताण तणाव कमी होईल. वाटाघाटीचा प्रश्न लवकरच सोडवता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात नाव होईल. पैसा मिळेल त्याचा नीट वापर करा. कोर्टकेस लांबणीवर न टाकता पूर्ण करा. पोलीसी खात्यातील संशोधन कार्यात वरिष्ठ तुमची पाठथोपटतील प्रमोशनची शिफारस नोकरीत होऊ शकते. शुभ दि. 31,१

- Advertisement -

वृषभ ः- चंद्र बुध त्रिकोण योग, तुळेत शुक्र प्रवेश होत आहे. महत्वच्या कामात आळस करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात वेळ काढू धोरण त्रासदायक ठरू शकते. उधारीवर घेतल्या मालासाठी पैशाची मागणी होऊ शकते. मैत्रीत सप्ताहाच्या शेवटी वाद संभवतो. संसारातील प्रश्नाचा विचार करून त्यावर मार्ग शोधा. खर्च वाढेल. विद्यार्थी वर्गाने खोट्या पद्धतीने वागल्यास नुकसान होईल. गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगतिची संधी मिळेल. टिकाव धरा. नम्रता ठेवा. नोकरीत काम वाढेल. पोलीसी संशोधन कार्यात कामाचे कौतुक होईल. पण जबाबदारी वाढेल. शुभ दि. 26, 28

मिथुन ः- सूर्य चंद्र त्रिकोण योग व तुलेत शुक्र प्रवेश तुमच्या कार्याला वेग प्राप्त करेल. राजकीय-सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. अधिकाराचा उपयोग जनहितासाठी केल्यास पुढे टिकाव धरता येईल. नुसता स्वार्थ पाहू नका. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. थकबाकी वसूल करा. जमिन, घर इ. मोठी खरेदी करता येईल. संतंतीच्या प्रगतिची, सुखाची खबरबात मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात विशेष चमकाल. पुरस्कार मिळेल. परदेशात जाण्याची संधी येईल. कोर्टकेस लवकर संपवा या सप्ताहात चांगले यश मिळेल. संशोधन कार्यात, किचकट कामात बुद्धिची चमक दिसेल. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळवता येईल. शुभ दि. 29,30

- Advertisement -

कर्क ः- सूर्य चंद्र त्रिकोण योग व तुलेत शुक्र प्रवेश होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात सप्ताहाच्या सुरुवातीला धावपळ होईल. तणाव व वाद होऊ शकतो. सहनशीलता ठेवल्यास पुढे मार्ग सोपा होईल. प्रतिष्ठा टिकवता येईल. धंद्यात नवे विचार उपयोगी येतील. शेअर्स मध्ये योग्य सल्याने गुंतवणूक करा. सल्यासाठी भेटता येईल. संसारात तुमच्यावर जबाबदारी वाढेल. खाण्याची काळजी घ्या. कला-क्रिडा क्षेत्रात कल्पनाशक्ति वाढेल. आत्मविश्वास वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. विरोधक मैत्री करण्यास येतील. संशोधन कार्यात ताण पडला तरी धागा सापडेल. विद्यार्थी वर्गाने जिद्दीने पुढे जावे आळसाने नुकसान होईल. शुभ दि. 29.30

सिंह ः- चंद्र नेपच्यून युति, तुलेत शुक्र प्रवेश होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला योग्य प्रकारे कार्य करता येईल. निर्णय घेता येईल. लोकांचे प्रेम, सहकार्य मिळेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल करण्याची संधी मिळेल. मंगळवार, बुधवार धंद्यातील अंदाज चुकू शकतो. वाद व समस्या येईल. नवे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. संसारात शुभ समाचार मिळेल. मुलांची प्रगति होईल. थकबाकी वसूल करा. कला-क्रिडा क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. पुरस्कार व पैसा मिळेला. नविन मित्र मिळतील. परदेशात जाण्याचा योग येईल. विवाहाचा निर्णय निश्चित होऊ शकते. वरिष्ठ खुष होतील. शुभ दि. २६,27

कन्या ः- चंद्र बुध त्रिकोण योग, तुलेत शुक्र प्रवेश होत आहे. नोकरीच्या कामात सावध रहा. वरिष्ठ कोपण्याची शक्यता आहे. अचानक बदली संभवते. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्यावर दबाव राहिल. निर्णय घेण्यासाठी मनाची द्विधा अवस्था विरोधक करतील. तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. आत्मविश्वास राहिल. कुठेही उतावळेपणा करू नका. धंद्यात काम मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाने मोठ्यांचा अपमान करू नये. कायदा पाळावा. संशोधन कार्यात गोंधळ होऊ शकतो. धावपळ व तणाव होईल. कोणताही करार नीट करा. शुभ दि. 29,30

तुला ः- सूर्य चंद्र त्रिकोण योग, स्वराशीत शुक्र प्रवेश. म्हणजे तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने कामास लागा. वरिष्ठांना तुमची गरज भासेल. धंदा वाढेल. योग्य ठिकाणी पैसा गुंतवा. या सप्ताहात खर्च वाढेल. घरातील वाद मंगळवार, बुधवार वाढू शकतो. आपसांत द्वेष होईल. खरेदी करण्याची घाई नको. वाहन जपून चालवा. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नविन ओळख होईल, परंतू व्यवहार करू नका. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. विद्यार्थी वर्गाला नवा उत्साह मिळेल. लग्नासाठी स्थळे येतील. घरातील वाटाघाटीत नाराजी होऊ शकते. संशोधन कार्यात दिशा मिळेल. शुभ दि. 31,1

वृश्चिकः – चंद्र बुध त्रिकोण योग, तुलेत शुक्र प्रवेश होत आहे. साडेसातीचे शेवटचे पर्व सुरू आहे. या सप्ताहात राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक अडचणी निर्माण करतील. स्वतःची काळजी घ्या. वाहनापासूसन धोका संभवतो. धंदा मिळेल. आळस करू नका. वेळेवर स्वतःची कामे करा. काम वाढेल. वेळ कमी पडेल. नोकरीत कष्ट पडतील. कला-क्रिडा क्षेत्रात जबाबदारी वाढेल. मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता सप्ताहाच्या शेवटी आहे. कोर्टाच्या कामात फसगत होऊ शकते. विचारपूर्वक वागा. संशोधन कार्यात बुद्धिची धमक दिसेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर जास्त मेहनत घ्यावी. शुभ दि. 28,29

धनु ः- सूर्य चंद्र त्रिकोण योग, तुलेत शुक्र प्रवेश होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घेतल्याचे समाधान मिळेल. तुमची योजना गतिमान होईल. थांबू नका. नोकरीत बढती-बदली करू शकाल. घरात आनंदी रहाल. मुलांच्या समस्या सोडवता येतील. नविन मोठ्या लोकांची ओळख वाढल्याने कला-क्रिडा क्षेत्रात प्रगति होईल. मोठे आश्वासन मिळेल. पुरस्कार व पैसा मिळेल. विद्यार्थी वर्गाला चमकदार यश मिळेल. ध्येय पूर्ण होईल. कोर्टकेस लवकर संपवा. जिद्द ठेवा गर्व नको. संशोधन कार्यात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 27,28

मकर ः- सूर्य चंद्र बडाष्टक योग, तुलेत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचे मनोबळ कायम राहिल. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणीवर मात करता येईल. मोठेपणा मागून मिळत नाही तुम्ही लोकांच्यासाठी चांगले काम करा. तुम्हाला यश मिळेल. तुम्ही लोकांच्यासाठी चांगले काम करा. तुम्हाला यश मिळेल. तुमच्या प्रतिष्ठेवर टिका होईल. नोकरीत कायद्याचे पालन करा. निर्णय इतरांच्या सांगण्यावरून घेऊ नका. कोर्टकेस मध्ये तुमचे मुद्दे प्रभावी वाटतील. तुमच्या बाजूने निकाल लागण्याची आशा वाटेल. कला-क्रिडा क्षेत्रात कष्टाने यश मिळेल. धावपळ होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. संशोधन कार्यात नेटाने पुढे जाता येईल. मुलांनी ध्येय गाठावा. शुभ दि. 24, 29

कुंभ ः- सूर्य चंद्र त्रिकोणयोग, तुलेत शुक्र प्रवेश करीत आहे. या सप्ताहात तुमचे तुमच्या कार्यात प्रभाव वाढेल. यश मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यातील अडचणी कमी होऊन तुमचे डावपेच चांगल्या पद्धतीने खेळता येतील. संसारातील समस्या सोडवता येतील. धंद्यात नविन संधी मिळेल. निर्णय मात्र सावधपणे घ्या. शनिवारी तुमच्या निर्णय ठरवता येईल. कला-क्रिडा क्षेत्रात चमकाल. कोर्टाच्या कामात पुढे जाता येईल. गुप्त कारवार्‍यांना रोखता येईल. विद्यार्थी वर्गाला स्वतःचे ध्येय गाठता येईल. दूरच्या प्रवासाच्या बेत ठरवाल. संशोधन कार्यात मोठे यश मिळेल. शुभ दि. 31,1

मीन ः- सूर्य चंद्र बडाष्टक योग, शुक्र तुलेत प्रवेस करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला अडचणी येतील. सावधपणे कोणताही निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे काम कौतुकास्पद असले तरी त्याचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे मानू नका. सहनशीलता ठेवावी लागेल. धंद्यात मोठे काम घेऊन ठेवा. थकबाकी वसूल करा. शेअर्समध्ये फायदा होईल. कला-क्रिडा क्षेत्रात तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रसिद्धीचा विचार करू नका. कष्ट घ्या. विद्यार्थाी वर्गाने चौफेर अभ्यास करावा यश मिळवता येईल. संशोधनात गोंधळ होऊ शकतो. कोर्टाच्या कामात योग्य तेच बोला गर्व करू नका. शुभ दि. 30,31

- Advertisement -