घरICC WC 2023IND vs AUS: विश्वचषकात भारताची विजयी सलामी; तगड्या कांगारूंना लोळवले

IND vs AUS: विश्वचषकात भारताची विजयी सलामी; तगड्या कांगारूंना लोळवले

Subscribe

विश्वचषकातील प्रत्येक सामना हा महत्वाचा मानल्या जातो. त्यामुळेच प्रत्येक सामना जिंकल्यांचा अटोकाट प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो.

चेन्नई : विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्यांकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. तगड्या ऑस्ट्रेलिया संघाशी होत असलेल्या सामन्यांत भारत हरतो की, जिंकतो यावरूनच पुढील वाटचाल ठरणार होती. अशातच भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचा नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली ठरला. (IND vs AUS Indias winning debut in World Cup Rolled the sturdy kangaroos)

विश्वचषकातील प्रत्येक सामना हा महत्वाचा मानल्या जातो. त्यामुळेच प्रत्येक सामना जिंकण्यांचा अटोकाट प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो. अशात आज 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या मैदानांवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमने-सामने आले. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ऑस्ट्रेलिया भारतापुढे धावांचा डोंगर उभा करेल असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजानी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद 200 धावा करू शकला. विशेष म्हणजे त्यांनी पूर्ण षटकंसुद्धा खेळले नाहीत. 200 धावसंख्या भारतीय फलंदाज सहज गाठतील असे वाटत असतानाच अगदी कमी धावसंख्येवर सलामीचे फलंदाज तंबूत परतल्याने पुन्हा एकदा भारतीय संघाच्या कामगिरीकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते. अशातच विराट कोहली आणि केएल राहुल या दोन्ही फलंदाजानी दमदार फलंदाजी करत विजय साकार केला. असे जरी असले तरी दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने 97 धावांची नाबाद खेळी तर कोहलीने 85 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने 11 धावा केल्या.

- Advertisement -

अशी केली दोन्ही संघातील खेळाडूनी कामगिरी

ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. वॉर्नरनेही 41 धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने 28 धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा : CORONA : सावधान, तो परत येतोय; 24 तासांत देशात आढळले कोरोनाचे 43 रुग्ण

- Advertisement -

असा झाला सामना

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने 69 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला, मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी तोडली. वॉर्नरने 41 धावा केल्या. स्मिथ आणि लॅबुशेनने 36 धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला 46 आणि लॅबुशेनला 27 धावांवर बाद केले. त्यांनी अॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 119 धावांवर तंबूत परतला. 15 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर कुलदीपने मॅक्सवेलला बोल्ड केले. लवकरच ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स 15 धावा करून बाद झाला तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस मिचेल स्टार्कने 28 धावा करत संघाची धावसंख्या 199 धावांपर्यंत नेली.

हेही वाचा : विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून कोट्यवधींची वसुली; 6 महिन्यांत ‘इतक्या’ फुकट्यांनी केला प्रवास

भारताकडून खराब सुरुवात

200 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. दोन धावांवर तीन फलंदाज तंबूत परतले. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. स्टार्कने इशान किशनला तर हेजलवूडने रोहित आणि श्रेयसचा बळी घेतला. यानंतर राहुलसह कोहलीने डावाची धुरा सांभाळली. त्याला 12 धावांवर जीवदान मिळाले. यानंतर दोघांनीही मागे वळून पाहिले नाही. दोघांनी आपापली अर्धशतकं झळकावली आणि शतकी भागीदारी केली. यानंतरही तो क्रीजवरच राहिला. कोहलीचे शतक हुकले आणि 85 धावांवर तो हेजलवुडचा तिसरा बळी ठरला. यानंतर राहुलने हार्दिक पांड्यासोबत सामना संपवला. मात्र, त्याचे शतकही हुकले आणि 97 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो नाबाद राहिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -