घरलाईफस्टाईलचिमूटभर हिंग गरम पाण्यात घालून घेतल्याने होतील 'हे' फायदे

चिमूटभर हिंग गरम पाण्यात घालून घेतल्याने होतील ‘हे’ फायदे

Subscribe

चिमूटभर हिंग गरम पाण्यात घालून घेतल्याने कोणते फायदे होतात.

हिंग हा एक मसाल्यातील पदार्थ आहे. मात्र, याचे आरोग्यदायी फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण चिमूटभर हिंग गरम पाण्यातून घेतल्याने अनेक तक्रारी दूर होतात. चला तर जाणून घेऊया चिमूटभर हिंग गरम पाण्यात घालून घेतल्याने कोणते फायदे होतात.

डोके दुखी

- Advertisement -

डोके दुखी होत असल्यास हिंगाचा वापर करावा. कारण हिंगामुळे जळजळ आणि पित्त कमी होते. तसेच डोक्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी होत असल्याने डोकेदुखीपासून आराम मिळण्यासाठी हिंगपाणी घ्यावे.

सर्दी

- Advertisement -

ज्या व्यक्तींना सर्दीचा त्रास होतो अशा व्यक्तीने गरम पाण्यातून चिमूटभर हिंग घालून त्याचे सेवन करावे. त्यामुळे श्वसनाच्या तक्रारी दूर होतात आणि सर्दी होण्यापासून बचाव होतो.

मासिक पाळीच्या समस्या

मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यासाठी हिंगपाणी एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे पाठ आणि पोटाच्या खालच्या भागातील वेदना कमी होतात. हिंगामुळे रक्त पातळ होते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. पाळीच्या कालावधीत नियमितपणे हिंगपाणी प्यावे.

रक्तातील साखरेची पातळी कमी होते

रक्तातील साखरेची पातळी हिंगामुळे कमी होते. त्यामुळे हिंगामुळे स्वादुपिंडातील पेशी सक्रिय होतात आणि त्यामुळे अधिक इन्शुलिन तयार होते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

उच्च रक्तदाबाचे नियंत्रण

रक्तात गुठळ्या तयार होण्यापासून रोखणारे घटक हिंगामध्ये असतात. त्याचबरोबर शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास हिंगाची मदत होते. त्यातून पुढे रक्तदाब नियंत्रणास उपयोग होतो. जर पाण्यातून घ्यायचा नसेल तर तुम्ही ताकातूनही हिंगाचे सेवन करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -