घरलाईफस्टाईलडी-हायड्रेशनपासून सावधान

डी-हायड्रेशनपासून सावधान

Subscribe

उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. कडक उन्हात भ्रमंती केल्याने घाम येतो. घामावाटे शरीरातील क्षार आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणात कमी होतात. अशावेळी आपणास डी-हायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अतिप्रमाणात घाम येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टर्सचा सल्ला घेणे गरजेचे आहे, तसेच काही गोष्टी टाळूनही डी-हायड्रेशनच्या समस्येपासून आपण दूर राहू शकतो.

भरपूर पाणी प्या – विशेषकरून उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे, तसेच विविध फळांचा रस पिणेही फायदेशीर ठरते. प्रत्येक व्यक्तीच्या वजन, उंची तसेच शारीरिक गरजेनुसार पाण्याची आवश्यकता कमी अधिक असू शकते.

- Advertisement -

अति श्रम टाळा – श्रम करणे आरोग्यदायी असते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात कष्टदायी कामे केल्याने मोठ्या प्रमाणात घाम येऊन डी-हायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अति श्रमदायी कामे करणे टाळा.

सुती व सौम्य रंगाचे कपडे घाला – गडद रंगाचे कपडे घातल्याने अधिक प्रमाणात उष्णता शोषली जाते. परिणामी घाम येण्याचे प्रमाणदेखील वाढते, तसेच तंग कपडे घातल्याने शरीराला बाहेरील थंडावा मिळणे कठीण होते. म्हणूनच सैलसर व सौम्य रंगाचे सुती कपडे उन्हाळ्याच्या दिवसात घालावेत.

- Advertisement -

योगा करावा – ‘योगा’ हा आरामदायी व शरीरातील नसांना शांत करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. योगसाधनेमुळे घाम निर्मिती करणार्‍या ग्रंथींवर नियंत्रण राखणे शक्य होते.

पोटॅशियम युक्त पदार्थ खावेत – डी-हायड्रेशन म्हणजे फक्त शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे असे नाही. पाण्याबरोबरच शरीरातून आवश्यक इलेक्ट्रोलाईट्सचादेखील र्‍हास होतो. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढवण्यासाठी केळं, आंबा, अननस, शहाळं अशा पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

धूम्रपान, मद्यपान टाळा – धूम्रपान, मद्यपान करणे आरोग्यासाठी हानीकारक आहे हे आपण सर्वच जाणतो. सिगारेटच्या धुरामुळे घशात कोरड निर्माण होऊन डी-हायड्रेशनची समस्या वाढते, तसेच मद्यपानामुळे यकृतावर परिणाम होतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वर्ज्य कराव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -