घरमुंबईबेकायदा रेती उपसा, परप्रांतीयांमुळे सागरी सुरक्षेला धोका

बेकायदा रेती उपसा, परप्रांतीयांमुळे सागरी सुरक्षेला धोका

Subscribe

कोळी युवा शक्तीने व्यक्त केली भीती

वसई खाडीत नंबर नसलेल्या पडावातून होत असलेला बेकायदा रेती उपसा आणि किनार्‍यालगत फोफावत चाललेल्या परप्रांतीयांच्या अनधिकृत वस्त्यांमुळे वसईच्या सागरी किनार्‍याला धोका निर्माण झाल्याची भीती कोळी युवा शक्तीने व्यक्त केली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव आणि दहशतवादाचे असलेले सावट लक्षात घेऊन मुंबईसह अनेक सागरी किनार्‍यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. वसईच्या सागरी किनार्‍यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे वसईच्या खाडीत नंबर नसलेल्या पडावांतून अनधिकृतपणे रेती उपसा केला जात आहे. त्यासाठी परप्रांतीयांना पडावावर कामाला ठेवण्यात आले आहे. या परप्रांतीयांनी सागरी किनार्‍यावरील जमिनींवर अतिक्रमण करून आपली बेकायदा वस्ती उभारली आहे.त्यांच्याकडे ओळख पटणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत.

- Advertisement -

तरीही ते कस्टम आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयासमोरील खाडीतून बेकायदा वाहतूक करीत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही यंत्रणेने वचक ठेवलेला नाही. त्यामुळे या पडावांचा आणि वाढत्या वस्त्यांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची भीती कोळी युवा शक्तीने व्यक्त केली आहे, तसेच वसई कोळीवाड्यातील शासकीय गोदामांमागील सरकारी जमिनीवरही बेकायदा वस्त्या वाढत आहेत. या वस्त्यांमधील रहिवासी कोण आहेत? ते कुठून आलेत, याची कुठलीही पुरेशी नोंद किंवा माहिती संबंधित यंत्रणांकडे नाही. तरीही या वस्त्यांना वीज, पाणी, रेशनकार्ड अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -