घरलाईफस्टाईलतुमच्याही कपाळावर येतात का पुटकुळ्या?

तुमच्याही कपाळावर येतात का पुटकुळ्या?

Subscribe

हे करा उपाय.

बऱ्याच जणांना कपाळावर मुरुम येण्याची समस्या जाणवते. ही समस्या तशी सामान्य असली तरीही प्रचंड वेदनादायक आहे. तसेच त्यामुळे सौंदर्यात बादा येते. कारण त्वचा सुंदर असेल तर आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपल्या त्वचेचे सौंदर्य टिकवणे हे पूर्णत: आपल्या हातात असते. खाण्यापिण्याच्या सवयी, सौंदर्यप्रसाधनाचा अतिवापर यामुळे ही समस्या उद्भवते. मात्र, ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

चेहरा स्वच्छ धुणे

आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर क्लींझर लावून त्वचा एक्सफोलिएट करा. तसेच चेहरा वारंवार पाण्याने धुऊन घ्या.

- Advertisement -

केस स्वच्छ करा

बऱ्याचदा केसाला तेल लावतो. त्यामुळे केस तेलकट होतात. त्यामुळे ते तेल देखील कपाळावर उतरुन मुरुम येतात. त्यामुळे केस तेलकट होण्यापूर्वीच शॅम्पूनं धुवावेत

ब्युटी प्रोडक्ट कधीच वापरू नये

एखादे ब्युटी प्रोडक्ट वापरल्यानंतर चेहऱ्यावर जळजळ होत असल्यास ते प्रोडक्ट कधीच वापरू नये.

- Advertisement -

आठ तास झोप

पुरेशी झोप मिळाली नाही का त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे रात्री कमीत कमी सात ते आठ तासांची झोप घ्यावी.

उन्हामध्ये फिरणं टाळा

शक्यतो उन्हात फिरु नका. तसेच उन्हातून आल्यावर चेहरा गार पाण्यानं स्वच्छ धुवा.

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम आणि योगासने करा यामुळे त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. तसेच मद्यपान आणि धूम्रपान करू नका आणि पौष्टिक आहाराचे सेवन करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -