घरलाईफस्टाईल२० मिनिटाची डुलकी काढा फिट रहा

२० मिनिटाची डुलकी काढा फिट रहा

Subscribe

फक्त दिवसातून २० मिनिटे डुलकी घ्या.

बऱ्याचदा दिवसभर काम केल्याने थकवा येतो. अशावेळी थोडसं झोपाव, आराम करावा असेही वाटत. मात्र, ते शक्य होत नाही. परंतु दिवसातून आपण फक्त २० मिनिटांची एक डुलकी घेतली तर शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. चला तर पाहूया २० मिनिटाच्या डुलकीचे फायदे.

स्मरणशक्ती वाढते

- Advertisement -

दिवसा २० मिनिटाची डुलकी घेतल्याने आपला मेंदू तरतरीत राहतो. त्यामुळे आपली स्मरणशक्तीही वाढते.

हार्ट हेल्दी ठेवते

- Advertisement -

दिवसातून २० मिनिटांची डुलकी घेतल्याने हृदयापर्यंत योग्य प्रकारे रक्तपुरवठा होतो. यामुळे ते सशक्त राहते.

रक्तदाब सुधारतो

दिवसभरात कधीही २० मिनिटांची डुलकी घेतल्याने संपूर्ण शरीराची रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.

तणाव कमी होतो

दिवसा २० मिनिटाची डुलकी घेतल्याने कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते. यामुळे तणाव कमी होतो.

ब्लड सर्क्युलेशन सुधारते

दिवसा डुलकी घेतल्याने बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. यामुळे मसल्स रिलॅक्स होतात.

अलर्टनेस वाढवतो

दिवसातून २० मिनिटे डुलकी घेतल्याने एकाग्रता वाढते. यामुळे अलर्टनेस वाढवण्यात मदत मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -