घरलाईफस्टाईलमिल्क बर्फी रेसिपी

मिल्क बर्फी रेसिपी

Subscribe

जाणून घ्या 'मिल्क बर्फी'ची रेसिपी

गोड पदार्थ कोणाला नाही आवडत. प्रत्येकांना गोड खाण्यास आवडते. त्यात घरी केलेली एखादी बर्फी असेल तर अधिकच उत्तम. आज आम्ही तुम्हाला ‘मिल्क बर्फी’ कशी बनवायची ते सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • ३/४ कप दूध
  • १/२ कप साखर
  • ४ चमचे तूप
  • केशर
  • ३ कप मिल्क पावडर

कृती

सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध घ्यावे. त्यानंतर त्यात अर्धा कप साखर, तूप, केशर आणि ३ कप मिल्क पावडर घालून एकजीव करुन घ्यावे. हे सर्व मिश्रण एकसारखे परतून घ्यावे. त्यानंतर एका ट्रेला तूप ग्रीस करुन त्यामध्ये मिश्रण घालून चांगले स्प्रेड करुन घ्यावे. त्यानंतर त्यावर पिस्त्याचे काप टाकावे आणि १ तास तसेच ठेऊन द्यावे. नंतर त्याचे काप काढून सर्व्ह करावे. अशाप्रकारे मिल्क बर्फी तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -