घरलाईफस्टाईलउपवासाचे मेदू वडे

उपवासाचे मेदू वडे

Subscribe

उपवासाचे मेदू वडे रेसिपी

बऱ्याच जणांचे आठवड्यामध्ये एक दिवस तरी उपवास हा असतो. मात्र, उपवासाच्या दिवशी काही पोट भरुन खाल्ले नाही की, डोके दुखी, पित्ताचा त्रास अशा अनेक समस्या उद्धभवतात. अशावेळी काहीतरी पोट भरुन खाणे गरजेचे असते. अशा व्यक्तींकरता खास उपवासाच्या मेदू वड्याची रेसपी पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

एक कप वरी
एक मोठा उकडलेला बटाटा
१ / ४ कप शेंगदाणे कुट
१ / ४ कप दही
एक चमचा जिरे
चार मिरच्या बारीक चिरुन
२ चमचे बारीक कापलेले ओले खोबरे
मीठ
तळण्यासाठी तेल

कृती–

- Advertisement -

दोन कप गरम पाण्यात मीठ घालून भगर धुवून घालावी आणि त्याचा भात करून घ्यावा. त्यानंतर भात पूर्ण थंड झाल्यावर मोकळा करून त्यात बटाटा किसून घालून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, दही, जिरे, खोबरे, मिरची, मीठ घालून पाच मिनिटे चांगले मळून घ्यावे. त्यानंतर त्याचे मेदू वड्यासारखे गोळे करून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात वडे तळून घ्यावेत. हे खुसखुशीत उपवासाचे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -