घरलाईफस्टाईलआरोग्यासाठी खास टीप्स

आरोग्यासाठी खास टीप्स

Subscribe

सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आरोग्याची काळजी घेण्याची फार गरज आहे. काही छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण लक्ष देऊन केल्यास आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते.

  • बाहेरुन कुठूनही आल्यानंतर सर्वप्रथम हात-पाय स्वच्छ धुवावे. तसेच जेवणापूर्वी किंवा काही खाण्यापूर्वी देखील हात साबणाने स्वच्छ करुन त्यानंतर जेवणास सुरुवात करावी.
  • स्वयंपाक घर खास करुन स्वच्छ ठेवावे. त्याचबरोबर खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावे. महत्त्वाचे म्हणजे कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवावे.
  • जेवण बनवण्याआधी भांडी स्वच्छ धुणे फार गरजेचे आहे.
  • आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा समावेश करा. शिळे अन्नपदार्थ खाणे टाळा.
  • झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. तसेच घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -