घरलाईफस्टाईलरक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला द्या 'हे' गिफ्ट

रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट

Subscribe

रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. हा सण खास बनवण्यासाठी तुमच्या बहिणीला भविष्यात उपयोगी पडेल असे काहीतरी गिफ्ट करा. जसे तुम्ही तुमच्या बहिणीसाठी FD आणि RD मध्ये गुंतवणूक करू शकता. खरे तर आपण आर्थिक विचार करून आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट केले तर तिला भविष्यात खूप मदत मिळेल.

रक्षाबंधनाला बहिणीला काय द्यावे?

रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीसाठी FD उघडल्यास भविष्यात तिला मदत होईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही २५ रुपये किंवा त्याहून अधिकची FD उघडू शकता. FD किती वर्षांसाठी उघडायची हा तुमचा निर्णय आहे. आता राखीच्या दिवशी बहिणीला FD चे पेपर द्या. बहिणीला जेव्हा गरज असेल तेव्हा FD ची रक्कम खूप उपयोगी पडेल. जर तुमची बहीण लहान असेल तर तुम्ही तिचे पैसे थेट 10 वर्षांसाठी गुंतवू शकता.

- Advertisement -

रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा

महिलांसाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी, महिला बचत सन्मान पत्र अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले व्याज मिळते. तुमच्या बहिणीला तिच्या भविष्यात मदत करण्यासाठी तुम्ही अशा कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता.

- Advertisement -

राखीवर बहिणीसाठी वैद्यकीय विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करा

तुम्ही बहिणीसाठी वैद्यकीय विमा पॉलिसी देखील खरेदी करू शकता. आजकाल आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय विमा पॉलिसी असणे अत्यंत आवश्यक आहे. वैद्यकीय विमा पॉलिसी लोकांसाठी कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत खूप उपयुक्त आहेत.

बहिणीला गिफ्ट कार्ड द्या

रक्षाबंधनाच्या दिवशी रोख रक्कम देण्याऐवजी तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट कार्ड देखील देऊ शकता. तुम्ही 200 रुपयांपासून तुम्हाला हव्या त्या रकमेपर्यंत भेट कार्ड घेऊ शकता. याद्वारे, तुमच्या बहिणीला भविष्यात जेव्हाही खरेदी करायची असेल तेव्हा कार्ड वापरता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -