घरलाईफस्टाईलHair Tips : केस काळे करण्यासाठी वापरा किचनमधील हे पदार्थ

Hair Tips : केस काळे करण्यासाठी वापरा किचनमधील हे पदार्थ

Subscribe

आम्ही तुमच्यासाठी काही खास घरगुती पदार्थांचे रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. याच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करु शकता.

पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी आजकाल बाजारातील वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो, परंतु त्यातील केमिकलमुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही खास घरगुती पदार्थांचे  उपाय घेऊन आलो आहोत. याच्या वापराने तुम्ही तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करु शकता. तसेच याच्या वापराने तुमचे केस काळे तर होतीलच,शिवाय दाट आणि चमकदार सुद्धा होतील.

केस काळे करण्याचे घरगुती उपाय

- Advertisement -

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, पांढऱ्या केसांना पुन्हा काळं करायचे असेल तर, तुम्ही आवळा पावडर,कढी पत्ता, चहापावडर यांसारख्या घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

आवळा पावडर

- Advertisement -

आवळा आयुर्वेदिक असल्यामुळे तो केसांसाठी खूप उपयुक्त आहे. एका भांड्यात एक कप आवळा पावडर काळसर होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात ५०० मिलीलीटर नारळाचे तेल टाकून, मंद आचेवर २० मिनिटापर्यंत गरम करा. २४ तासानंतर म्हणजेच एक दिवसानंतर एका बाटलीमध्ये हे तेल भरून ठेवा. आणि आठवड्यातून २ वेळा हे तेल तुमच्या केसांमध्ये लावा. यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे केस काळे होतील.

कढी पत्ता


कढी पत्त्याला २ चमचे आवळा पावडर आणि २ चमचा ब्राम्ही पावडर सोबत एकत्र वाटून घ्या. या मिश्रणामध्ये पानी मिक्स करून पेस्ट तयार करा आणि अर्ध्या तासापर्यंत हे केसांमध्ये लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या.

 चहापावडर


चहापावडरला उकळवून घ्या आणि केसांवर त्याचा लेप लावा. या उपायाने तुमचे केस हळूहळू काळे होतील. याशिवाय चहापावडर पावडर करून घ्या आणि त्यात लिंबाचा रसाचे काही थेंब टाका. हे मिश्रण केसांना लावा. अर्ध्या तासानंतर  केस धुवून टाका.

हेही वाचा :Beauty Tips : सनटॅनपासून सुटका हवी? मग करा या घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा वापर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -