घरलाईफस्टाईलखवय्यांची इच्छा पूर्ण करणारा हॉटेल सदिच्छा

खवय्यांची इच्छा पूर्ण करणारा हॉटेल सदिच्छा

Subscribe

आपण खातो त्या पदार्थांबरोबर हॉटेलचा आसपासचा परिसर पण महत्त्वाचा असतो आणि हेच या हॉटेलच्या यशाचे खरे सूत्र आहे.खास मालवणी पदार्थांसाठी अशी या हॉटेलची ओळख आहे.

सांताक्रूझ पूर्व म्हणजे मुंबईतील नेहमीच वर्दळीचा भाग.झोपडपट्टया आणि टोलेजंग इमारती या परिसरात आहेत. तशीच या परिसरात मराठी माणसांसोबतच देशाच्या कानाकोपर्‍यातून येणारी निरनिराळ्या प्रांतातील लोक वसले आहेत.मुंबईच्या इतर भागांपेक्षा या भागाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे इतर ठिकाणसारखी खाण्यासाठी बरीचशी हॉटेल्स अशी नाहियेत. आहेत ती पण मोजकीच आणि दर्जेदार. त्यांपैकीच एक हॉटेल म्हणजे हॉटेल सदिच्छा.वाकोला सिग्नल आणि मिलिटरी कॅम्प या सांताक्रूझ पूर्वेकडील भागात असलेल्या दोन-चार हॉटेल्सपैकी सदिच्छा हे हॉटेल आहे.

वाकोला आणि आसपासच्या परिसरातील खव्वयांच्या हक्काचे असे हे हॉटेल आहे. आठवडाभर या हॉटेलमध्ये गर्दी असते.या हॉटेलचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे असलेली स्वच्छता.आपण खातो त्या पदार्थांबरोबर हॉटेलचा आसपासचा परिसर पण महत्त्वाचा असतो आणि हेच या हॉटेलच्या यशाचे खरे सूत्र आहे.खास मालवणी पदार्थांसाठी अशी या हॉटेलची ओळख आहे. त्याचप्रमाणे येथे मिळणारे कोल्हापुरी आणि राईसचे इतर प्रकारही उत्तम चवीचे असतात. विशेष म्हणजे चिकन मिक्स राईस हा माझ्या आवडीचा. इतर हॉटेल्सप्रमाणे येथे देखील त्या दिवशीची विशेष रेसिपी असते.

- Advertisement -

हॉटेलचे वेटरही उत्तमरित्या आपली कामगिरी चोख बजावतात.दररोज होणारी गर्दी पाहता आता या हॉटेलचे विस्तारिकरण करण्यात आले आहे.हॉटेलचा आवाका जरी वाढला असला तरी हॉटेलची चव तशीच आहे आणि दर देखील सामान्य खवय्यांच्या खिशाला परवडणारे असतात. निरनिराळ्या भाषा बोलणारी,तेवढीच निराळी चव असलेली माणसे येथे येतात.परंतु,सदिच्छाची चव सर्वांच्याच पसंतीस येते. सांताक्रूझ आणि आसपासच्या परिसरातील खव्वयांची इच्छा खर्‍या अर्थाने सदिच्छा पुरवत आहे.

कसं जायचं? – सांताक्रूझ पूर्वेला,वाकोला मस्जिदच्या समोर

- Advertisement -

-जयेश सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -