घरलाईफस्टाईलया चार स्टेपमध्ये लावा 'लिपस्टीक'

या चार स्टेपमध्ये लावा ‘लिपस्टीक’

Subscribe

लिपस्टिक लावण्याची एक वेगळी पद्धत असते. त्या पद्धतीनुसार लिपस्टक लावल्यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ टिकण्यास मदत होते.

स्टेप १ – लिपस्टीक लावण्यासाठी सर्वप्रथम तुमचे ओठ मुलायम असणे गजेचे आहे. कारण जर ओठांना सुरकुत्या असल्यास लिपस्टीक देखील उठावदार दिसत नाही. यासाठी सर्वप्रथम मॉइश्चराइज करावे किंवा लिप बाम लावावा. यामुळे ओठ मुलायम होण्यास मदत होते.

स्टेप २ – त्यानंतर लिप पेन्सिलने ओठांना आउट लाइन करुन घ्यावी. यामुळे लिपस्टिक ओठांना लावणे सहज सोपे जाते.

- Advertisement -

स्टेप ३ – ओठांना लिपस्टिक लावताना सर्वप्रथम एकदा हलक्या हाताने लिपस्टिक लावून घ्यावी आणि त्यानंतर त्यावर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा लावावी. यामुळे लिपस्टिक डार्क होण्यास मदत होते.

स्टेप ४ – लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर हलक्या बोटाने ट्रांसलुऐंट पावडर लावा. याने शेड सेट होईल आणि आपली लिपस्टिक पसरणारही नाही आणि हलकीही पडणार नाही. यानंतर पुन्हा एक कोट लावा. यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ राहण्यास मदत होते.

- Advertisement -

टीप – लिपस्टिक नेहमी फ्रिजमध्ये ठेवावी यामुळे लिपस्टिक मेल्ट होत आणि ती ओठांवर सहा ते सात तास टिकण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -