घरलाईफस्टाईलघरात RO नाही तर 'असे' करा पाणी फिल्टर

घरात RO नाही तर ‘असे’ करा पाणी फिल्टर

Subscribe

जेवढे चांगले पाणी तेवढे चांगले आयुष्य. आपण दिवसातून खूप वेळा पाणी पितो आणि पाण्याची गरज आपल्याला कायमस्वरूपी आहे. अशातच हल्ली प्रत्येकाकडे वॉटर प्युरिफायर असते. पण बहुतेक लोकांकडे आता सुद्धा ROचे पाणी नाही आहे. पिण्याचे पाणी चांगले नसले तर आपण आजारी पडू शकतो . त्यामुळे डॉक्टर पण आपल्याला गरम पाणी नाहीतर चांगले फिल्टर पाणी वापरायला सांगतात . पाण्यात शार खूप असतात पाणी फिल्टर केले कि स्वच्छ होते. म्हणून आपण फिल्टर चा वापर केला पहिजे.

वॉटर फिल्टर पाण्यामधून गाळ आणि घाण पदार्थ म्हणजे (हानिकारक रसायने, केमिकल्स, टॉक्सिन्स) काढून टाकतात. तसेच पाण्याची चव फिल्टरमुळे यामुळे सुधारते आणि बर्‍याच रासायनिक दूषित पदार्थांची पातळी कमी होते. वॉटर प्यूरीफायर ही अशी गोष्ट आहे जी पाण्यातील सर्व दूषित घटकांपैकी 90-95% काढून टाकते. अशातच जर का अजूनही तुमच्याकडे ROचे पाणी नसेल तर तुम्ही या प्रकारे पाण्याला स्वच्छ करून पिऊ शकता. अशातच हे पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया…

- Advertisement -

Effects of Unfiltered Drinking Water in the Home | Pentair Water Solutions

घरात ‘या’ पद्धतीने पाणी करा फिल्टर

  • पाण्यामध्ये सल्फर, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम ही द्रव्ये असतात.
  • जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आपल्या पचनसंस्थेला मिनरलयुक्त पाणी मजबूत बनवते.
  • तसेच आपल्याला रोज ज्या नळातून पाणी येते त्या नळाला छोटी गाळणी बसवा.
  • जेवढे पाणी प्यायला लागणार ते वेळोवेळी गरम करत राहा. नळाला आलेले पाणी तसेच पिऊ नका.
  • गरम पाणी तांब्याच्या भांड्यात काढून ठेवा. हे पाणी प्याल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
  • तसेच पाण्यात काय किटाणू असतील तर ते उकळलेल्या पाण्यातून निघून जातील.
  • गरम पाणी उकळून झाल्यावर या पाण्याला कॉटनच्या कपड्यातून सुद्धा गाळून घ्या.
  • यामुळे पाण्यातील अतिरिक्त जो काही कचरा असेल तो लगेच निघून जाईल आणि पाणी स्वच्छ होईल.
  • अशातच पाणी फिल्टर करून पिणे हे आपल्या प्रत्येकाच्या हेल्दी लाईफसाठी खूप आवश्यक आहे.
  • घरातले पाणी वेळोवेळी बदलत राहा. यामुळे पाण्यामध्ये घाण साचणार नाही.
  • तसेच आपल्या आरोग्याला शुद्ध पाण्याची गरज असते.
  • पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नळ बसवा. जेणेकरून शरीराला चांगले पाणी मिळेल.
  • अशातच तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास याची जास्त मदत होईल.

हेही वाचा : Home Tips : माती नाही तर पाण्यात लावा झाडे

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -