ऑफिसला जाताना आपण अनेक फॅन्सी बॅग्स वापरतो. तसेच जसे आपले आऊटफिट्स असतात तशीच बॅग्स आपण जास्त करून वापतो. अशातच जर का आपण पाहिलं तर बहुतेक वेळा महिला त्यांच्या बॅग्समध्ये अनेक वस्तू ठेवत असतात. पण पुरुषांच्या बॅग्स मध्ये इतकं काही नसत. अशातच जर का आपण पाहिलं तर ऑफिसची बॅग एका काळानंतर खराब होते.
आपण ऑफिसच्या कामात बॅग धुवायची विसरून जातो. पण मग या बॅगला घाणेरडा वास येतो किंवा बॅग आतमधून खराब व्हायला सुरुवात होते. तसेच तुम्ही सुद्धा अनेक प्रकारच्या ऑफिस बॅग्स रोज वापरत असाल आणि तुम्हाला सुद्धा बॅग धुवायचा कंटाळा येत असेल तर या टिप्सच्या मदतीने तुम्ही बॅग व्यवस्थित स्वच्छ करू शकता.
अशाप्रकारे करा ऑफिस बॅग करा स्वच्छ
- Advertisement -
- सगळ्यात आधी ऑफिसच्या बॅगमधून महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढा आणि त्यांना पूर्णपणे धुवून किंवा पुसून घ्या.
- आता एका टबमध्ये अर्धा टब पाणी भरा आणि त्यात लिक्विड डिटर्जंट , कॉस्टिक सोडा, व्हिनेगर आणि थोडा बेकिंग सोडा घाला.
- हे सर्व प्रॉडक्ट्स चांगले एकत्र माइक करून घ्या. आणि आता ते बॅग मध्ये घाला.
- हे करत असताना बॅग चांगली घासून घ्या.
- आता घासून घेतलेल्या बॅगमध्ये डिटर्जन्टचे पाणी तसेच त्यात ठेवा.
- हे झाल्यावर बॅगला चांगल्या पाण्यातून काढून घ्या.
- तुमच्याकडे वॉशिंग मशिन असल्यास, वॉशिंग मशिनमध्ये सुद्धा तुम्ही बॅग धुवू शकता.
- सगळ्यात शेवटी बॅग चांगल्या प्रकारे सुकवून घ्या.
- अशाप्रकारे तुमची ऑफिसची बॅग एका दिवसात छानपैकी स्वच्छ होईल.
ऑफिस बॅग स्वच्छ करताना या गोष्टी जाणून घ्या
- बॅग साफ करण्यापूर्वी, बॅगमध्ये काही महत्त्वाची वस्तू आहे का ते पहा.
- तसेच पेन, पेन्सिल किंवा स्केच त्यात आहे का हे एकदा तपासून पहा.
- अशातच पेन किंवा हायलाइटरमध्ये पाणी गेल्यास बॅग खराब होऊ शकते.
- याशिवाय, बॅगेच्या फॅब्रिकची देखील काळजी घ्या.
- तसेच चामड्याच्या बॅगा जास्त वेळ पाण्यात राहू शकत नाहीत, त्या खराब होऊ शकतात.
- तसेच अनेकवेळा बॅगची खालची बाजू खराब होते अशावेळी बॅग धुताना जास्त घासू नका.
- महत्वाचे म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये बॅग जास्त करून धुवू नका कारण बॅग लगेच खराब होते.
हेही वाचा : धुतल्यानंतर टॉवेल रफ होतो, मग वापरा ‘या’ ट्रीक्स
- Advertisement -
- Advertisement -