घरलाईफस्टाईलदररोज उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या टीप्स

दररोज उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या टीप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. यातून कॅल्शियम भरपूर मिळते. याकरता कोबी किसून कोशिंबीर करावी आणि त्याचे सेवन करावे.
  • पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढाताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरुन टाकावा आणि अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे, नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ आणि कुरकुरीत होतो आणि तव्याला अजिबात चिकटत नाही.
  • इडल्या उरल्यावर कुस्करुन त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो. त्याप्रमाणे उपमा बनवावा.
  • पुलाव, जिरा राइस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्या कराव्यात. भात मोकळा होतो.
  • पुलाव तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे. तसेच मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. उकळी आल्यावर गॅस बंद करुन पाणी थंड झाल्यावर पाण्यात भात शिजवावा. पुलावला छान स्वाद येतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -