घरलाईफस्टाईलगृहिणींसाठी खास किचन टिप्स

गृहिणींसाठी खास किचन टिप्स

Subscribe

खास किचन टीप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही.

- Advertisement -

जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरुन ठेवावे. त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरु शकता.

कोशिंबीरीसाठी काकडी किसल्यावर त्या किसलेल्या काकडीला पाणी सुटत नाही.

- Advertisement -

वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली, की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी. त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात.

मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते.

चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावे, यामुळे वस्तू नव्यासारख्या दिसतात.

बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एका बाजूची साले काढून मग उकडायला लावावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -