घरलाईफस्टाईलझणझणीत कोल्हापुरी चिकन

झणझणीत कोल्हापुरी चिकन

Subscribe

चिकनचे अनेक प्रकार असतात. त्यातील कोल्हापुरी चिकन हे सगळ्यात झणझणीत असते. ते बऱ्याच जणांना आवडते देखील, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आज झणझणीत कोल्हापुरी चिकनची रेसिपी दाखवणार आहे.

साहित्य

- Advertisement -
  • ५०० ग्रॅम चिकन

मॅरीनेट करण्यासाठी

  • १ १/४ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • १/२ टीस्पून हळद
  • चवीनुसार मीठ
  • २ टेबलस्पून दही

वाटणासाठी मसाला

- Advertisement -
  • १ १/२ कप उभा चिरलेला कांदा
  • १/२ टीस्पून खसखस
  • २-३ काजू
  • ३-४ टीस्पून ओलं खोबरं
  • ३ लवंगा
  • ६-७ काळे मिरी
  • १ दालचिनीचा तुकडा
  • १/२ टीस्पून शहाजिरे
  • १ टीस्पून धने

रश्यासाठी

१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ टीस्पून लाल तिखट
१ कप बारीक चिरलेला टोमॅटो
३ टेबलस्पून तेल

कृती

चिकन २ ते ३ तास आधी मॅरीनेट करून फ्रीजमध्ये ठेवा. तर कोमट पाण्यात खसखस भिजवून ठेवा. वाटणासाठीचा कच्चा कांदा, लवंग, मिरी, दालचिनी, काजू, धणे, शहाजिरे, ओलं खोबरं आणि कोमट पाण्यात भिजवलेली खसखस हे सगळं जिन्नस किंचित कोमट पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून कांदा फोडणीला टाका. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता. नंतर वरील वाटण घालून ते परता. वाटणा पुरती मीठ घाला. दोन मिनिटाने चिकन घालून ते परता. बेताचे पाणी घालून ढवळा. नंतर १५-२० मिनिटे झाकण लावून चिकन शिजू द्या. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -