घरलाईफस्टाईलप्लास्टिक बंदी? वापरा 'ही' इको फ्रेंडली उत्पादने

प्लास्टिक बंदी? वापरा ‘ही’ इको फ्रेंडली उत्पादने

Subscribe

प्लास्टिक फ्रि जीवन जगण्यासाठी काही उपाय

सध्याच्या हवामान बदलामुळे, प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर जरी बंदी घालण्यात आली असली तरी आपल्या रोजच्या जीवनात नकळत आपण अनेक प्लास्टिकची उत्पादनं वापरतो. फेस वॉश, शॅम्पू, टूथब्रश, फण्या आणि मासिक पाळीसाठी वारपले जाणारे पॅड या सारखी अनेक उत्पादने प्लास्टिक पॅकेजिंगचे किंवा प्लास्टिकने बनवलेले असतात. तर आपण आपल्या रोजच्या जीवनात पर्यावरणाचा विचार करून काही इको फ्रेंडली उत्पादनांचा वापर करू शकतो. ही उत्पादने वापरून एका ‘शून्य कचरा जीवनशैली’कडे पाऊल उचलता येईल.

बांबू टूथब्रश 

- Advertisement -

प्लास्टिकची विल्हेवाट नीट न झाल्यामुळे वायू आणि पाण्याचं फार प्रदूषण होतं. हा बांबू टूथब्रश पूर्णतः बांबूने बनवलेला असतो. तर त्याचे ब्रिस्टल्स बीपीए मुक्त असून नायलॉनचे असतात.

- Advertisement -

बांबू \ लाकड्याच्या कॉम्ब

प्लास्टिक ऐवजी या फण्या पूर्णत: बांबूने बनवलेल्या असतात. अशा या इको फ्रेंडली फण्या ऑनलाईन आणि बाजारात देखील उपलब्ध आहेत.

रि-युजेबल स्ट्रॉ

अनेकदा आपण घराबाहेर काही पेयं घेतो तेव्हा त्याबरोबर प्लास्टिक स्ट्रॉ दिला जातो. हा स्ट्रॉ समुद्री जीवनाला फार हानीकारक ठरतो. तर त्यावर उपाय म्हणून रि-युजेबल स्ट्रॉचा वापर करता येऊ शकतो. हे स्ट्रॉ अनेक अनेक ठिकाणी सहज उपलब्ध मिळतात.

रि-युजेबल कापडाचे पॅड

मासीक पाळीसाठी वापरले जाणाऱ्या पॅड्सला प्लास्टिक पॅकेजिंग तर असतेच, पण त्याहून आपण त्याची विल्हेवाट सुद्दा व्यवस्थित लावू शकत नाही. त्यामुळे वायू प्रदूषण होते. त्यावर मात करण्यासाठी रि-युजेबल कापडाचे पॅड्स बाजारात उपलब्ध आहेत. हे रि-युजेबल कापडाचे पॅड्स ६ ते ७ वर्षांपर्यंत वापरता येतात.

शॅम्पू बार

केसांसाठी शॅम्पू हा गरजेचा तर असतोच पण हा शॅम्पू प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये मिळतो. ऑनलाईन अनेक ठिकाणी शॅम्पू बार उपलब्ध आहे. साबणासारखा हा शॅम्पू बार नैसर्गिकरीत्या बनवला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -