घरलाईफस्टाईलझटपट बनवा हेल्दी, टेस्टी 'पनीर ब्रेड रोल'; जाणून घ्या रेपिसी

झटपट बनवा हेल्दी, टेस्टी ‘पनीर ब्रेड रोल’; जाणून घ्या रेपिसी

Subscribe

लहांनापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना स्नॅक्समध्ये काहीतरी नवीन खाण्याची हौस असते. बहुतेक लोकं ब्रेकफस्टमध्ये ब्रेडचा वापर करतात. अशावेळी तुम्ही कुरकुरीत ब्रेडसोबत पनीरच्या सॉफ्टनेसने स्नॅक्सच्या चवीला एक वेगळा तडका देऊ शकता. अगदी झटपट पद्धतीने तुम्ही पनीर ब्रेड रोल्स बनवू शकता. यासाठी ब्राऊन ब्रेडचाही वापर करता येईल. पनीर ब्रेड रोल बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

पनीर ब्रेड रोल बनवण्यासाठी साहित्य

ब्रेड – 6 ब्रेड

- Advertisement -

पनीर – 1 कप (किसलेले)

आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून

- Advertisement -

लाल तिखट – अर्धा टीस्पून

गरम मसाला – अर्धा टीस्पून

चाट मसाला – १ टीस्पून

टोमॅटो सॉस – 1 टीस्पून

हिरवी धणे – 1 टीस्पून (बारीक चिरून)

चवीनुसार मीठ

बटर – 2 टीस्पून

तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार

पनीर ब्रेड रोल बनवण्याची रेसिपी

1) पनीर ब्रेड रोल बनवण्यासाठी प्रथम ब्रेड घ्या आणि त्याची काट काढून घ्या,

२) एका भांड्यात पनीर, आले-लसूण पेस्ट, बटर, सर्व मसाले आणि सॉस मिक्स करा.

3) ब्रेडवर हलके पाणी लावून तयार केलेला पनीर मसाला भांड्यात भरा.

4) हलके पाणी लावून ब्रेडला रोलचा आकार द्या.

5) आता तेल गरम करा आणि तयार रोल मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.

6) चविष्ट पनीर ब्रेड रोल तयार आहेत, चहा किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.


…तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार; एकनाथ खडसेंनी ठणकावले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -