घरलाईफस्टाईलहे उपाय करून "व्हॅलेंटाइन्स डे" पर्यंत मिळवा नितळ त्वचा

हे उपाय करून “व्हॅलेंटाइन्स डे” पर्यंत मिळवा नितळ त्वचा

Subscribe

"व्हॅलेंटाइन्स डे" काही दिवसांवर आला आहे. ही वेळ असते आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची. डॉक्टरांनी सांगितलेले हे उपाय करून मिळवा नितळ त्वचा.

“व्हॅलेंटाइन्स डे” काही दिवसांवर आला आहे. ही वेळ असते आपल्या प्रिय व्यक्तींना भेटण्याची, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची आणि नवीन नाती फुलवण्याची. यातील सर्वांत आवश्यक भाग म्हणजे ‘छान दिसणे’ आणि या विशेष दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीची किंवा होणाऱ्या जोडीदाराची नजर आपल्यावरच खिळलेली असावी असे तर कोणालाही वाटेलच! केवळ स्त्रियांनाच नाही, तर आजच्या मेट्रोसेक्शुअल पुरुषांनाही मोहक दिसण्याची, समोरच्यावर छाप पाडण्याची इच्छा असतेच. या दिवसासाठी नितळ त्वचा कशी मिळवाल यासाठी द ऍस्थेटीक क्लिनिक्सच्या, त्वचाविकार तज्ञ, डॉ.रिंकी कपूर यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

त्वचा तत्काळ उजळवण्यासाठी उपचार पध्दती

मायक्रोडर्माब्रेशन – या उपचार पद्धतीला स्किन पॉलिशिंग असेही म्हटले जाते. यामध्ये त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकला जातो. त्यामुळे त्याखाली लपलेली ताजीतवानी, नितळ त्वचा समोर येते. चेहऱ्यावर हे उपचार करवून घेण्यासाठी ३० मिनिटांचे सत्र असते. १-२ दिवसांत त्वचा उजळते आणि हा उजळपणा आठवडाभर टिकून राहतो. उजळपणा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी या विशेष दिवसाच्या काही आठवडे पूर्वीपासून दर आठवड्याला हे उपचार घेऊ शकता.

- Advertisement -

केमिकल पील्स – यामध्ये नैसर्गिक एक्स्फोलिअंट वापरून त्वचेवर लेपन केले जाते. हे एक्स्फोलिअंट त्वचेला तजेला देते आणि कोलॅजेनला उत्तेजित करून त्वचा चमकदार करते. ग्लायकोलिक, भोपळ्याचे पील्स, लॅक्टिक पील्स सुरक्षित आहेत आणि ते वापरल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्वचेवर चमक येते. यलो पील, सॅसिसिलिक वगैरे पील्स आणखी परिणामकारक आहेत. यांमुळे अनेक दिवस त्वचेवर पीलिंग दिसत राहते. विशेष दिवस २ महिने किंवा त्याहून लांब असेल तर हा उपचार उत्तम आहे.

फोटोफेशिअल्स/मेडिफेशिअल्स – नेहमीच्या ‘हंबल’ फेशिअलचाच अधिक चांगला प्रकार आहे. संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी किंवा ब्युटी पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्या साध्या फेशिअल क्रीम्समुळे त्वचेला खाज सुटणाऱ्यांसाठी हा प्रकार नियमित फेशिअलच्या तुलनेत खूपच सुरक्षित आहे.

- Advertisement -

एनडी वायएजी लेसर –  लेसर टोनिंग या क्षेत्रातील सर्वांत नवीन उपचार आहे. हा उपचार प्रशिक्षित व्यावसायिकाकडून करून घेतल्यास त्याचे साइड-इफेक्ट्स होत नाहीत.  या पद्धतीने त्वचा खूप जलद स्वच्छ होते आणि तिच्यावर तत्काळ चमक येते.

मेसोथेरपी – हे प्लेटलेट समृद्ध फेशिअल किंवा व्हॅम्पायर फेशिअल आणि त्वचा ताजीतवानी करणाऱ्या कॉकटेल सोल्युशन्ससह इलेक्ट्रोफोरेसिस हे उपचार सुरक्षितही आहेत. झटपट परिणाम हवा असल्यास उत्तम आहेत.

तोंडावाटे औषधे –  ज्यांची त्वचा रापली आहे किंवा त्वचेचा रंग बाह्य कारणांमुळे काळवंडला आहे ते ग्लुटॅथिऑन किंवा क जीवनसत्वासह अल्फा लिपॉइक अाम्ल यांसारखी अॅण्टिऑक्सिडंट्स तोंडावाटे मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात. यामुळे  मुळातील विषारी घटक काढून टाकले जातात आणि त्वचेचे आरोग्य सुधारून ती चमकदार दिसू लागते.

त्वचेवर चमक यावी म्हणून काही सोपे घरगुती उपाय

दूध + मध – यामुळे त्वचेतील पाण्याची पातळी वाढते व ती चमकदार दिसते
गुलाबपाणी + मुलतानी माती- तेलकट त्वचेसाठी
दळलेले ओट्स + हळद + मध – झटपट त्वचा ताजीतवानी करण्यासाठी
लिंबाचा रस + मध + कोरफड – निस्तेज त्वचेसाठी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -