घरलाईफस्टाईलअशी घ्या दातांची काळजी!

अशी घ्या दातांची काळजी!

Subscribe

दातांची निगा राखण्यासाठी अनेक गोष्टी मनुष्य करताना दिसतो. आपले दात अधिक सुंदर दिसण्यासोबत त्यांचे आरोग्य उत्तम असणे तितकेच आवश्यक आहे.

आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आपल्या चालण्या-बोलण्यातून आणि वर्तवणुकीतून होत असते. त्यात ही प्रकर्षाने समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडण्याचे मोलाचे काम हे आपले हास्य करत असते. समाजात असे अनेक लोक आहेत त्यांच्या तोंडाचे आरोग्य हे १०० टक्के व्यवस्थित नसते. रोजच्या रोज ब्रश करून आमच्या दातांचे आरोग्य उत्तम आहे, असा समज असणारे लोक अधिक आहेत, परंतु त्यांचे दात हे निरोगी असतातच असे नाही. दातांचा उपयोग मनुष्य अन्न चर्वणाशिवाय अनेक कामासाठी करताना दिसतो. जसे की, थंड शीतपेयाच्या बाटल्या उघडणे, प्लास्टिकची सीलबंद पाकिटे उघडण्यासाठी करतो. यासोबत अति उष्ण किंवा अति थंड पदार्थांचे सेवन करणे हे दातांच्या आरोग्यास हानीकारक असते.

- Advertisement -

त्यासाठी करा काही खास घरगुती टिप्सचा वापर..

घरगुती टिप्स

दात लवकर स्वच्छ होण्यासाठी अर्धा चमचा अ‍ॅपल व्हिनेगरमध्ये ऑलिव्ह ऑईल मिसळून ब्रशने संपूर्ण दातावर लावून दात स्वच्छ करावेत.

- Advertisement -

लिंबाच्या रसात थोडे पाणी घालून दातांवर मसाज केल्याने दातांची चमक वाढण्यास मदत होते.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांची एकत्र पेस्ट तयार करून दातांवर लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.

संत्र्याची साल आणि तुळशीची पाने सुकवून त्याची पूड तयार करून दातांवर घासल्याने निर्माण होणार्‍या हिरड्यांच्या समस्या दूर होतील.

टूथपेस्टमध्ये वाळलेल्या तुळशीच्या पानांची पूड मिक्स करून लावल्यास दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होईल.

मिठामध्ये मोहरीचे तेल घालून दातांना लावल्याने दातांचा पिवळेपणा निघण्यास मदत होते.

केळीच्या सालीने हलक्या हाताने दातांवर मसाज केल्यास दातांची चमक वाढण्यास मदत होते.

दातांवर ऑलिव्ह ऑईलने कापसाच्या सहाय्याने मसाज केल्यास दात स्वच्छ होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -