घरलाईफस्टाईललिपस्टिकची शेड निवडताना...

लिपस्टिकची शेड निवडताना…

Subscribe

आपल्या मेकअपमधील महत्त्वाचा घटक म्हणजे लिपस्टिक. ओठांवर लिपस्टिकचा रंग चढवल्याशिवाय आपला मेकअप पूर्णत्वास येत नाही. बाजारात विविध प्रकारचे लिपस्टिक उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी आपल्या चेहर्‍याला, रंगाला, कपड्यांना आणि समारंभानुसार कोणती शेड वापरावी, याबाबत मात्र नेहमीच संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे लिपस्टिकची शेड निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच कोणत्या वेळी कोणती शेड वापरावी याबाबतचे काही टीप्स जाणून घेऊ या…

* गुलाबी, मरून, लाल, वाईन अशा लिपस्टिकच्या व्यतिरिक्त हटके रंग म्हणजेच जांभळा, राखाडी असे रंग वापरायचे असतील तर असे रंग कोणीही बिनधास्त वापरा. फक्त ते व्यवस्थित कॅरी करा त्यामध्ये अवघडलेपणा येऊ देऊ नका.

- Advertisement -

* ज्यांचे ओठ मोठे आहेत, अशा स्त्रियांनी असे रंग नक्कीच वापरून पाहावेत. अशा शेड लावताना साधारणतः कपड्यांचे रंग हलकेच असू द्या.

* कार्यक्रमानुसार आणि वेळेनुसार लिपस्टिकची निवड करा.

- Advertisement -

* पार्टी रात्रीच्या वेळी असेल आणि वेस्टर्न ऑऊटफिट असतील, तर साधारणतः लाल गुलाबी आणि गडद म्हणजेच डार्क शेडचा वापर करावा.

* रात्रीचा पारंपरिक कार्यक्रम असेल आणि पारंपरिक कपडे असतील तर ब्राऊन, गुलाबी, मरून असे रंग वापरावे.

* सकाळच्या कार्यक्रमांना फिकट रंगाच्या आणि त्वचेच्या रंगानुसार नैसर्गिक रंगाच्या शेड वापराव्या.

साधारणतः त्वचेच्या रंगानुसार लिपस्टिक वापरावी
१. कृष्णवर्णी
अशी त्वचा असणार्‍या स्त्रियांना तसेच मुलींना अनेक रंग खुलून दिसतात. यामध्ये गुलाबी, कोरल (गुलाबीसर) , पीच, लाल किंवा नारंगी रंगाची लिपस्टिक अशा रंगाच्या लिपस्टिक साधारणतः उठून दिसतात.

२. उजळ
अशी त्वचा असणार्‍यांना मॅट स्वरूपाच्या लिपस्टीक, थोड्या डार्क जसे ब्राऊन, बर्गंडी, कॉफी, ऑक्सब्लड अशा आकर्षक रंगाच्या लिपस्टीकची निवड करावी

३. सावळी
सावळा म्हणजेच डस्की त्वचेचा रंग असणार्‍यांना बर्न्ट ऑरेंज, पिंक (fuchsia pink)(जांभळट गुलाबी) अशा ब्राईट रंगाच्या लिपस्टिक उठून दिसतात.

४. गहूवर्णी
फिकटसर गुलाबी, गडद गुलाबी, फिकटसर ऑरेंज असे रंग गहूवर्णीय स्त्रियांना किंवा मुलींना उठून दिसतात. पण तुम्हाला साध्याशा कार्यक्रमाला किंवा रोजच्यासाठी लिपस्टिक लावायची असेल तर फिकटसर गुलाबी (कोरल पिंक ) शेड वापरा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -