घरमुंबईरेल्वे स्थानकांतील वॉटर व्हेंडिंगला प्रवाशांची पसंती

रेल्वे स्थानकांतील वॉटर व्हेंडिंगला प्रवाशांची पसंती

Subscribe

आयआरसीटीसीने जेव्हापासून रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशिन लावल्या तेव्हापासून मुंबईकरांना शुद्ध पाण्याची स्वस्त दरात उपलब्धता होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या या मशिनना प्रतिसाद वाढत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर २०० पेक्षा जास्त वॉटर व्हेंडिंग मशिन बसवण्यात आल्या आहेत. भविष्यात यात वाढ होणार असल्याची माहिती आयआरसीटीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

सुरुवातीला या मशिन लोकांच्या पंसतीला पडतील की नाही, याविषयी शंका होती. मात्र मुंबईकरांनी या वॉटर व्हेंडिंग मशिनना उत्तम प्रतिसाद दिला. आता आयआरसीटीसीने या मशिन चालविण्याचे खासगी कंत्राट देणे सुरू केले असून प्रत्येक मशिनसाठी कर्मचारी नियुक्त करावे लागत आहेत. आयआरसीटीसीने रेल्वे प्रवासात आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल नीर या नावाने बाटलीबंद पाणी बॉटल सुरु केली होती. त्यालासुद्धा प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद होता. मात्र आता रेल नीर आणि वॉटर व्हेंडिंग मशिनमध्ये स्पर्धा सुरू आहे. तेव्हापासून रेल नीरची विक्री घटली आहे. पूर्वी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर दररोज ५०० रेल नीर बाटल्यांची विक्री होत होती. ती आज ३५० वर आली आहे.

- Advertisement -

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना थंड पाणी मिळावे, यासाठी वॉटर व्हेंडिंग मशिन बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली आहे. भविष्यात रेल्वे प्रवाशांना यापेक्षा जास्त चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– पिनाकीन मोरावाला, प्रकल्प संचालक, आयआरसीटीसी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -