घरक्रीडामहाराष्ट्राच्या मुलांची उपांत्य फेरीत धडक

महाराष्ट्राच्या मुलांची उपांत्य फेरीत धडक

Subscribe

महाराष्ट्राच्या मुलांनी दिल्लीच्या संघाचा पराभव करत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर मुलींच्या संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशने पराभव केला.

पटणा, बिहार येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीला ४२-३० असे पराभूत केले. या सामन्याच्या मध्यांतराला महाराष्ट्राकडे २०-१३ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतरही महाराष्ट्राने दमदार खेळ करत हा सामना जिंकला. या सामन्यात अमरसिंह कश्यप, राहुल वाघमारे, पियुष पाटील यांनी अप्रतिम खेळ केला. याआधी उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत महाराष्ट्राने ओरिसाचा ३८-३५ असा पराभव केला होता.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचा उत्तर प्रदेशने २८-२५ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला ०९-१६ अशा पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने उत्तरार्धात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न फसला आणि त्यांचा ३ गुणांनी पराभव झाला. याआधीच्या सामन्यात महाराष्ट्राने राजस्थानला ४६-२२ असे पराभूत करत स्पर्धेची बाद फेरी गाठली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -