घरलाईफस्टाईलकॉर्पोरेट मेकअप करताना

कॉर्पोरेट मेकअप करताना

Subscribe

मेकअप लग्नाला जाताना किंवा काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तरच करतात असा अनेकजणींचा समज असतो. पण खरंतर रोज प्रेझेन्टेबल दिसणं ही आता कामाची गरज आहे. कामाच्या ठिकाणी टापटीप दिसायलाच हवं. त्यासाठी काय करता येईल?

* चेहर्‍यावर डाग, पॅच असल्यास आपल्यात वेगळाच न्यूनगंड निर्माण होतो. परिणामी कॉर्पोरेट स्पर्धेत आपण मागे पडतो. तेव्हा बाजारात छान फाऊंडेशन कॉम्पॅक्ट मिळतात याचा वापर करा जेणेकरून चेहर्‍यावर जर काही डाग असतील, पॅच असतील तर कमी दिसतील. त्यामुळे कार्यालयात सहकार्‍यांशी आत्मविश्वासाने स्पर्धा करू शकतो.

- Advertisement -

* कॉर्पोरेट मेकअपमध्ये योग्य लिपस्टीकची निवड करता येणे महत्त्वाचे आहे. लिपस्टिकच्या शेड्स निवडताना गडद रंग टाळावेत. आपल्या आवडीची लिपस्टिक लावावी. साधारणत: दिवसा पिंकपेच, हलका ब्राऊन कलर अशी लावावी. ओठांना भेगा असल्यास आधी लिपबाम लावून ठेवावा. मग लिपस्टिक लावावी व गरज भासल्यास ट्रान्सपरण्ट लिपग्लासचा वापर करावा.

* रामॉसी, आईन्सी तसेच मॅट आणि मिनरल बेस पावडर, फाऊंडेशनचा वापर तुम्ही कॉर्पोरेट मेकअपमध्ये करू शकता.

- Advertisement -

* काजळ भरलेल्या डोळ्यांमध्ये वेगळाच आत्मविश्वास असतो. त्यामुळे कॉर्पोरेट लूकमध्ये काजळ लावण्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. काजळ लावताना ती वॉटरप्रूफ आहे की नाही हे पाहावे. तसेच कॉर्पोरेट लूकमध्ये डोळ्यात भरपूर काजळ न भरता एखादी हलकी ओळ काजळ लावावे.

* हे एवढं केलं तरी चेहरा चांगला दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आपण चांगले दिसतोय असं वाटलं तर चारचौघांत बोलण्याचाही ऑकवर्डनेस कमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -