घरलाईफस्टाईलसकाळच्या वेळेस वजन केल्यास ते कमी का वाटते ?

सकाळच्या वेळेस वजन केल्यास ते कमी का वाटते ?

Subscribe

सकाळच्या वेळेस वजनाच्या काट्यावर चढल्यास अनेकदा वजन कमी वाटते आणि रात्री वजन केल्यास पुन्हा तुलनेत अधिक होते. पण अवघ्या काही तासांमध्ये वजनात असे बदल का होतात आणि त्यामागील कारण तुम्हाला ठाऊक आहे का ?

सकाळच्या वेळेस डिहायड्रेशन होत असल्याने वजन कमी वाटते. सुमारे एक कप पाण्यामुळेदेखील अर्धाकिलो वजन अधिक होते. शरीरातील पाणी कमी होण्याचे प्रमाण आरोग्यावर परिणाम करते. रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याच्या सवयीमुळे सकाळी डिहायड्रेशन होण्याचा त्रास कमी करतात. त्यामुळे सकाळी वजन थोडे जास्तही आढळून येते. मात्र रात्री उठून बाथरूमला जाण्याची सवय असेल तर शरीरात खूप पाणी राहत नाही.

- Advertisement -

रात्री जेवल्यानंतर कॅलरिज बर्न केल्यास सकाळी वजन काट्यावर तितकासा परिणाम दिसून येत नाही. अनेकदा सामान्य वजनापेक्षा अशावेळेस कमी वजन दिसून येते. हे कमी दिसणारे वजन शरीरातील फॅट्स कमी झालेले प्रमाण नसून ते घामातून शरीरात कमी झालेल्या पाण्याचे प्रमाण असते.

रात्रीच्या जेवणानंतर वजन खूप वाटते. अनेकांसाठी रात्रीचे जेवण हे दिवसभरातील सर्वात मोठे जेवण असते. त्यामुळे आहारातील पदार्थांमुळे, पेयांमुळे वजनकाटा अधिक वाटतो.वजन करण्यासाठी कोणती विशिष्ट वेळ नसते. मात्र तुमचे वजन पाहण्यासाठी नियमित ठराविक वेळेलाच तुमचे वजन करा. यामुळे तुम्हाला तुमच्या वजनाचा सरासरी अंदाज येण्यासाठी मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -